Breaking News

[post-marguee]

[ays_poll id=7]

गोदावरीच्या वेळेवर उन्हाळी विशेष गाडी सुरू; चाकरमाने आणि प्रवाशांमध्ये मात्र रेल्वे प्रशासनाने दिशाभूल केल्याचा आरोप

Apr 12, 2022

यंदाच्या अर्थसंकल्पात रेल्वेच्या विकासासाठी भरीव तरतूद करण्यात आली आहे देशभरातील ४०० रेल्वे स्थानकांचे आधुनिकीकरण आणि नूतनीकरण करण्यात येणार आहे . त्यासाठी अकरा हजार दोनशे कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे . देशभरातील महत्त्वाच्या रेल्वे स्थानकांच्या विकासात विकासासाठी हा निधी खर्च करण्यात येणार आहे. या महत्त्वाच्या रेल्वे स्थानकांमध्ये मनमाड जंक्शन रेल्वे स्थानकाचा ही समावेश क

उत्तर महाराष्ट्रसह जिल्ह्याची जीवन वाहिनी म्हणुण ओळखले जाणाऱ्या मनमाड – कुर्ला गोदावरी एक्सप्रेसच्या धरतीवर आजपासून ( दि. ११ सोमवार ) उन्हाळी विशेष रेल्वे गाडी प्रशासनाच्या वतीने प्रयोगिक तत्वावर सुरू करण्यात आली.रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी मुंबईतून व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे तर केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ.भारती पवार यांनी मनमाड रेल्वे स्थानकातून हिरवा झेंडा दाखविला.पुढील ३५ दिवस ही गाडी सुरू राहणार आहे.गाडीचा येणारा नफा पाहून ही गाडी पूर्ववत केली जाणार आहे. कोरोना प्रादुर्भाव कमी होताच सर्व प्रवाशी रेल्वे गाड्या पूर्वपदावर सुरू करण्यात आले. मात्र गोदावरी एक्स्प्रेस सुरू न झाल्याने चाकरमानी ,विद्यार्थी व प्रवाश्यांची मोठी गैरसोय होत होती.गोदावरी एक्सप्रेस सुरू करावी यासाठी प्रवाशी व प्रवाशी संघटनेतर्फे वेळोवेळी मागणी केली जात होती.रेल्वे प्रवाशी संघटनेतर्फे याच मागणीसाठी उच्च न्यायालयात जनहित याचिकाही दाखल केली होती.तर केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ.भारती पवार यांच्या पाठपुराव्याने गोदावरी एक्स्प्रेसच्या धरतीवर उन्हाळी विशेष रेल्वे गाडी पुढील ३५ दिवस प्रायोगिक तत्त्वावर सुरू राहणार आहे. उन्हाळी एक्सप्रेस सुरू झाल्याने प्रवाश्यांची मोठी सोय झाली आहे.झेंडा दाखविल्यानंतर स्वतः केंदीय राज्यमंत्री डॉ.भारती पवार यांनी या गाडीने प्रवास केला. दरम्यान आज सुरू करण्यात आलेली गाडी ही गोदावरी एक्सप्रेस नसून ही समर स्पेशल ट्रेन आहे. हीच गाडी गोदावरी एक्स्प्रेस असल्याचे भासवून रेल्वे प्रशासनाकडून दिशाभुल केली जात असल्याचा आरोप प्रवाशी संघटनेतर्फे करण्यात आला असून प्रवाशी संघटनेतर्फे निषेध करण्यात आला.तर नियमित प्रवास करणाऱ्या कार्यक्रमापूर्वी रेल्वे स्थानकावर या गाडीच्या विरोधात हातात फलक घेऊन विरोध केला.गोदावरी एक्सप्रेस पूर्ववत सुरू करण्याची मागणी केली तसेच जोपर्यंत गोदावरी एक्स्प्रेस सुरू होत नाही तोपर्यंत न्यायालयीन लढा सुरू राहणार असल्याचे पवित्र याचिकाकर्त्यांनी घेतला.

पहिल्याच दिवशी उन्हाळी स्पेशल रेल्वे गाडीमध्ये २५५ अनारक्षित, १३९ आरक्षित आणि ११ एसी असे ४०५ प्रवाश्यांनी या गाडीतुन प्रवास मनमाड रेल्वे स्थानकातून तिकीट खरेदी करून प्रवास केला. तसेच मनमाड – नाशिक अनारक्षित तिकिटासाठी ६० रूपये,आरक्षित तिकीटासाठी ९० रुपये , एसी ३१५ रूपये तर मनमाड – मुबंईसाठी अनारक्षित तिकिटासाठी ११५ रूपये,आरक्षित तिकीटासाठी १४० रुपये , एसी ५७० रुपये लागणार आहे.

आज शुभारंभाच्या ट्रेन मध्ये गार्ड : पी .आर. पाठक,तिकिट निरीक्षक एम.बी.सोरटे, आर.के.लाल हे होते तर चालक राजीव नय्यर व नितेश भद्रावाले हे होते. मनमाड – छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई उन्हाळी विशेष गाडी हि मनमाड स्थानकातून सकाळी ८ : ४५ वाजता सुटणार असल्याची चर्चा सर्वत्र होत असतानाच मंत्री महोदय यांच्या उपस्थितीत उद्घाटनासाठी रेल्वे प्रशासनाने सकाळी ११ वाजता निघणार असल्याची घोषणा केली.मात्र ११ वाजून गेले तरीही मनमाडहुन मुंबई कडे उन्हाळी विशेष गाडी रवाना होत नसल्याने एका प्रवाशाने चक्क कार्यक्रमांमध्ये गोंधळ घातला.मंत्री महोदय करिता गाडीचा आणि कार्यक्रमाच्या वेळा बदलतात आणि सर्वसामान्यांसाठी कधी पाच मिनिटे का होईना गाडी उशिराने धावती का ? असा सवाल रेल्वे प्रशासनाचे अधिकारी तसेच रेल्वे सुरक्षा बल लोहमार्ग पोलिसांच्या अधिकारी यांना करताच तत्काळ पंधरा मिनिटे उशिराने उन्हाळी विशेष गाडी मुंबईकडे ही गाडी रवाना झाली.

असे राहणार वेळापत्रक

मनमाडहून सुटणार सकाळी ८.४५ वाजता , लासलगाव ९ .०४ , निफाड ९ .१७ , नाशिकरोड ९ .३८ , इगतपुरी १०.३२ , कल्याण १२.२३ , ठाणे १२.३८ , दादर १३.०३ , सीएसएमटी १३.२८ पोहचणार छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ( सीएसएमटी ) हून सुटणार १५.४५ , दादर १५.५७ , ठाणे १६.२३ , कल्याण १६.४८ , इगतपुरी १८.२७ , नाशिकरोड १ ९ .०८ , निफाड १ ९ .३१ , लासलगाव १ ९ .४४ , मनमाड २०.२८ पोहचणार

सुपरफास्टं उन्हाळी विशेष प्रवासी गाडीचा दर्जा गाडी क्रं. ०२१०२ अप व गाडी क्रं.०२१०१ डाऊन मनमाड ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ( सीएसएमटी ) सुपरफास्ट समर स्पेशल प्रवासी गाडीचा दर्जा देण्यात आला असून यागाडीला ३ बोगी आरक्षीत, ५ बोगी अनआरक्षीत आणि १ एक एसी असे ११ बोगी ( कोच ) राहाणार आहेत.मनमाडहून व सीएसएमटी येथून ११ एप्रिल ते १५ मे दरम्यानच्या जाऊन येऊन ३५ फेऱ्या फक्त मंजुरी देण्यात आली आहे.कोविडचे सर्व नियम त्यासाठी लागू असतील. तसेच वेळत देखील बदल होवू शकतो.

कोट: मनमाड – कुर्ला गोदावरी एक्सप्रेस वेळेत मनमाड – मुंबई समर स्पेशल गाडी सुरू करण्यात आली आहे. प्रवाशांनी या गाडीचा आता लाभ घ्यावा आणि ही गाडी पूर्ण क्षमतेने सुरू राहील याची दक्षता घ्यावी.रेल्वे प्रशासनाने ही या गाडीच्या आर्थिक नियोजनाबाबत काटेकोर लक्ष ठेवावे. डॉ.भारती पवार,केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री

अजून बातम्या वाचा..

नाशिक जिल्हा बँकेने ९ कर्जदारांना बजावल्या अंतीम जप्तीच्या नोटीसा; थकबाकीदारांमध्ये भीतीचे वातावरण ?

नाशिक जिल्हा बँकेने ९ कर्जदारांना बजावल्या अंतीम जप्तीच्या नोटीसा; थकबाकीदारांमध्ये भीतीचे वातावरण ?

नांदगाव : मारुती जगधने नांदगांव तालुक्यातील जिल्हा बँकेचे कर्ज घेतलेल्या व थकित झालेल्या ९...

read more
मनमाड महाविद्यालयात हिंदी दिवस उत्साहात साजरा… “हिंदी फक्त राष्ट्रभाषाच नव्हे तर विश्व भाषा” – श्री.राजेंद्र जगताप

मनमाड महाविद्यालयात हिंदी दिवस उत्साहात साजरा… “हिंदी फक्त राष्ट्रभाषाच नव्हे तर विश्व भाषा” – श्री.राजेंद्र जगताप

मनमाड: येथील महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित, कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयाच्या पदव्युत्तर...

read more
भाद्रपद महागणेशोत्सव ➖2024 निमित्त रविवारी वेशीतील प्राचीन श्री निलमणी गणेश मंदीरात सलग 10 वर्षी छप्पन महाभोग (महानैवेद्य) व श्री सत्यविनायक महापूजा या धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन

भाद्रपद महागणेशोत्सव ➖2024 निमित्त रविवारी वेशीतील प्राचीन श्री निलमणी गणेश मंदीरात सलग 10 वर्षी छप्पन महाभोग (महानैवेद्य) व श्री सत्यविनायक महापूजा या धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन

मनमाड - आम्ही परंपरा पाळतो... आम्ही संस्कृती चे रक्षण करतो.... हे ब्रीद घेऊन मनमाड शहरात धार्मिक...

read more
मनमाड करांच्या शिरपेचात अजून एक मानाचा तुरा तृप्ती पाराशर आकांक्षा व्यवहारे साईराज परदेशी आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी भारतीय संघात निवड

मनमाड करांच्या शिरपेचात अजून एक मानाचा तुरा तृप्ती पाराशर आकांक्षा व्यवहारे साईराज परदेशी आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी भारतीय संघात निवड

सुवा फिजी येथे १४ ते २१ सप्टेंबर २०१४ रोजी होणाऱ्या कॉमनवेल्थ चँपियनशिप साठी महाराष्ट्रातील एकमेव...

read more
मनमाड शहर भाजपा तर्फे आरक्षण विरोधी राहुल गांधी व हिंदू विरोधी शरद पवार यांचे विरोधात जोरदार घोषणा बाजी करीत निषेध आंदोलन

मनमाड शहर भाजपा तर्फे आरक्षण विरोधी राहुल गांधी व हिंदू विरोधी शरद पवार यांचे विरोधात जोरदार घोषणा बाजी करीत निषेध आंदोलन

राहुल गांधी यांनी अमेरिकेतील एका मुलाखती दरम्यान काँग्रेस भारतात सत्तेत आल्यास आरक्षण काढून टाकू...

read more
कासलीवाल स्कूलमध्ये माता पालकांसाठी कुकिंग बॅटल (कुकिंग विदाऊट फ्लेम्स ) स्पर्धेचे आयोजन…..

कासलीवाल स्कूलमध्ये माता पालकांसाठी कुकिंग बॅटल (कुकिंग विदाऊट फ्लेम्स ) स्पर्धेचे आयोजन…..

नांदगांव : दि १३ मारुती जगधने दि.13 सप्टेंबर 2024 नांदगाव येथील जे. टी. कासलीवाल इंग्लिश मिडियम...

read more
[hsas-shortcode group="" speed="10" direction="left" gap="50"]