Breaking News

[post-marguee]

[ays_poll id=7]

मनमाड महाविद्यालयात आरोग्य संपदा व्याख्यान व आरोग्य तपासणी शिबिर संपन्न

Apr 13, 2022

महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित कला,विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय मनमाड येथे महाविद्यालय व
महाविद्यालयाच्या महिला कल्याण तक्रार निवारण समिती यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक आरोग्य दिवसाचे औचित्य साधून महाविद्यालयाचे मा. प्राचार्य डॉ. ए. व्ही. पाटील यांच्या मार्गदर्शनाखालीआरोग्य संपदा या विषयावर व्याख्यान व आरोग्य तपासणी शिबिर या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले.
या कार्यक्रमासाठी प्रमुख वक्त्या म्हणून डॉ. सोनाली पाटील , श्रद्धा हॉस्पिटल , मनमाड या उपस्थित होत्या. त्यांनी आपल्या व्याख्यानात विद्यार्थिनींना आरोग्य कसे जपावे तसेच आरोग्य म्हणजे फक्त शारीरिक नव्हे तर त्याबरोबरच मानसिक व अध्यात्मिक आरोग्य किती महत्त्वाचे आहे हे पटवून दिले. व्याख्यानानंतर विद्यार्थिनींची तसेच उपस्थित महिला प्राध्यापकांची आरोग्य तपासणी देखील केली. या तपासणी दरम्यान त्यांनी महिला प्राध्यापिका व विद्यार्थिनींना बहुमोल असे मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे सन्माननीय प्राचार्य डॉ. ए व्ही पाटील होते. त्यांनी आपल्या अध्यक्षीय मनोगतात सांगितले की महिला या घराचा नव्हे तर देशाचा कणा आहे आणि त्यांनी आरोग्याविषयी जागरूक राहणे ही काळाची गरज आहे.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कुमारी लेपाक्षी परदेशी यांनी केले तर अतिथी परिचय आणि प्रास्ताविक प्रा.डॉ. आरती एस. छाजेड यांनी केले .
कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन प्रा. सुप्रिया शिरसाट यांनी केले. या कार्यक्रमाला कनिष्ठ विभागाच्या उपप्राचार्या सौ. ज्योती पालवे तसेच सर्व महिला प्राध्यापिका उपस्थित होत्या आणि मोठ्या संख्येने विद्यार्थिनींनी उपस्थिती दर्शवून व्याख्यानाचा व आरोग्य शिबिराचा लाभ घेतला.

अजून बातम्या वाचा..

मनमाड शहरातील नगरचौकी येथील अंतर्गत पाईपलाईन कामाचे  सौ.अंजुम ताई कांदे यांच्या हस्ते भूमिपूजन संपन्न

मनमाड शहरातील नगरचौकी येथील अंतर्गत पाईपलाईन कामाचे  सौ.अंजुम ताई कांदे यांच्या हस्ते भूमिपूजन संपन्न

मनमाड - आजपर्यंत फक्त पाण्यासाठीचे आश्वासने मिळालीत.एकदा एक योजना मंजूर झाली.मात्र काम न करताच...

read more
कवी रवींद्रनाथ टागोर इंग्लीश स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज मध्ये संत गाडगे बाबा जयंती साजरी

कवी रवींद्रनाथ टागोर इंग्लीश स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज मध्ये संत गाडगे बाबा जयंती साजरी

कवी रवींद्रनाथ टागोर इंग्लिश मीडियम स्कूल अँड ज्युनिअर कॉलेजमध्ये संत गाडगेबाबा यांना जयंतीनिमित्त...

read more
मराठा आरक्षणासाठी तालुक्यात नांदगांव मनमाड शहरासह सलग आठ दिवस सलग तिन तास रास्तारोको आंदोलन

मराठा आरक्षणासाठी तालुक्यात नांदगांव मनमाड शहरासह सलग आठ दिवस सलग तिन तास रास्तारोको आंदोलन

नांदगाव : मारूती जगधने दि २४ फेब्रुवारी ते २ मार्च पर्यंत सलग ८ दिवस रास्तारोको करण्याचा निर्णय...

read more
[hsas-shortcode group="" speed="10" direction="left" gap="50"]