भीमराव रामजी आंबेडकर तथा डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे भारतीय न्यायशास्त्रज्ञ, अर्थशास्त्रज्ञ,राजकारणी, तत्त्वज्ञ आणि समाजसुधारक होते. त्यांनी दलित बौद्ध चळवळीला प्रेरणा दिली आणि अस्पृश्य (दलित) लोकांविरुद्ध होणारा सामाजिक भेदभाव नष्ट करण्यासाठी चळवळ उभारली, तसेच महिलांच्या आणि कामगारांच्या हक्कांचे समर्थन केले. स्वतंत्र भारताचे पहिले कायदेमंत्री, भारतीय संविधानाचे शिल्पकार, भारतीय बौद्ध धर्माचे पुनरुज्जीवक होते. देशाच्या विविध क्षेत्रांत दिलेल्या योगदानामुळे त्यांना ‘आधुनिक भारताचे शिल्पकार’ किंवा ‘आधुनिक भारताचे निर्माते’ असेही म्हणतात.यंदाची डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 131वी जयंती , मनमाड शहरामध्ये दरवर्षी मोठ्या उत्साहात आणि आनंदात सर्वधर्मीय नागरिक हे बाबासाहेबांची जयंती साजरी करत असतात. यंदाच्या वर्षी देखील विविध कार्यक्रमाद्वारे जयंती साजरी करण्यात आली , डॉ बाबासाहेब आंबडेकर यांच्या पुतळ्याला आकर्षक अशी विद्युतरोषणाई करण्यात आली असुन , 14 एप्रिलच्या पुर्व रात्रीला 12 वाजता शहरातील भीम अनुयायी आणि प्रेमींनी बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. डॉ बाबासाहेब आंबडेकर सार्वजनिक जयंती उत्सव समितीच्या वतीने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येऊन आतिषबाजी करण्यात आली , शहरातील विविध सामाजिक संघटना आणि संस्थेच्या वतीने महामानव यांची जयंती साजरी करण्यात आली , शहरामध्ये भीमोत्सव समितीच्या वतीने देखील 11 , 12 आणि 16 एप्रिल रोजी नावाजलेले समाज प्रबोधनपर कार्यक्रमांचे आयोजन जयंती निमित्त करण्यात आले.
शहरातील रौनक फौंडेशनच्या वतीने भव्य मशाल यात्रेचे आयोजन करण्यात आले होते , रेल्वे कारखाना येथे देखील सर्व रेल्वे कामगार संघटनेच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी करण्यात आली , मुरलीधर नगर मित्र मंडळ आणि डायमंड सामाजिक संस्थेच्या वतीने बौध्द वंदना घेऊन खिरदान आणि सरबत वाटप करण्यात आले.संस्कृती संवर्धन समिती , राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वतीने देखील डॉ. बाबासाहेबांना अभिवादन करण्यात आले.
सायंकाळी शहरातील सर्वच परिसरातून जवळ-जवळ 30 ते 40 विविध सामाजिक विषयांचे देखावे सादर करून चित्ररथ काढण्यात आले. यावेळी मनमाड शहर पोलीस स्टेशनच्या वतीने शहरामध्ये चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.















