Breaking News

[post-marguee]

[ays_poll id=7]

राणा दाम्पत्याचा मनमाडला शिवसेना स्टाईल निषेध !

Apr 22, 2022

खा.नवनीत राणा आणि रवी राणा रेल्वे ने मुंबई जात आहे हे समजताच मनमाड च्या शिवसैनिकांनी हातात भगवे ध्वज घेऊन रेल्वे स्थानकावर धडक दिली. या बाबतचे सविस्तर वृत्त असे कि सध्या राज्यात हनुमान चालीसा आणि धार्मिक स्थळांवरील भोंगे या मुद्द्यावरून वातावरण तापले आहे. खा.नवनीत राणा यांनी मुंबई येथे मातोश्री समोर हनुमान चालीसा बोलू असे जाहीर केलेले आहे त्या साठी खा. राणा आणि आमदार रवी राणा हे विदर्भ एक्स्प्रेस ने मुंबई जात असल्याचे मनमाड येथील शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांना कळताच त्यांनी रात्री दोन वाजता रेल्वे स्थानकावर जात राणा दाम्पत्याचा शिवसेना स्टाईल निषेध नोंदविला. याच वेळेस रेल्वे पोलिसांनी शिवसैनिकांना रोखण्याचा प्रयत्न केला असता पोलिस आणि शिवसेना पदाधिकारी यांच्या शाब्दिक खडाजंगी झाल्याचे कळते. उद्धवसाहेब आगे बढो हम तुम्हारे साथ हे….नवनीत राणा वापस जाओ….आवाज कुणाचा…..शिवसेनेचा ह्या घोषणा दिल्या. हनुमान चालीसा म्हणत मनमाड च्या शिवसैनिकांनी राणा यांचा निषेध केला.या

यावेळी शिवसेना शहरप्रमुख मयुर बोरसे, जि.उपप्रमुख संतोषभाऊ बळीद, जि. संघटक राजाभाऊ भाबड, जि.समन्वयक सुनिल भाऊ पाटील, ता.संघटक संजय कटारिया, सुभाष माळवतकर, शहरउपप्रमुख जाफर मिर्झा, छोटू धाकराव, दिनेश घुगे, युवासेनेचे शहराध्यक्ष अमीन पटेल, अंकुश गवळी, ता.संघटक योगेश इमले, आशु पोहाल, सचिन दरगुडे, सिद्धार्थ छाजेड, योगेश शर्मा, आशिष पराशर, संघटक महेंद्र गरुड, कय्याम सैय्यद, वाहतूक सेनेचे अमजद शेख, बंटी आव्हाड, दिपक खैरे, दिपक मौर्य, ऋतिक मंगवाणा, संदिप गिरमकर व अनेक शिवसैनिक उपस्थित होते.

अजून बातम्या वाचा..

भविष्यातील चारा टंचाईवर मात करण्यासाठी ‘या’ शेतकऱ्यांना शासन देणार मोफत मका बियाणे

भविष्यातील चारा टंचाईवर मात करण्यासाठी ‘या’ शेतकऱ्यांना शासन देणार मोफत मका बियाणे

राज्यातील दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर भविष्यात जाणवणारी चारा टंचाईवर मात करण्यासाठी राज्य...

read more
इयत्ता दुसरी ते आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी असलेली PAT-2 चाचणी नोव्हेंबर २०२६च्या शेवटच्या आठवड्यात

इयत्ता दुसरी ते आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी असलेली PAT-2 चाचणी नोव्हेंबर २०२६च्या शेवटच्या आठवड्यात

विद्यार्थ्यांनी अपेक्षित अध्ययन निष्पत्ती कितपत साध्य केली आहे, हे तपासणे आणि त्यानुसार अध्यापन...

read more
कवी रवींद्रनाथ टागोर इंग्लिश मीडियम स्कूल व ज्युनिअर कॉलेज येथे महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री जयंती साजरी

कवी रवींद्रनाथ टागोर इंग्लिश मीडियम स्कूल व ज्युनिअर कॉलेज येथे महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री जयंती साजरी

मनमाड येथील कवी रवींद्रनाथ टागोर इंग्लिश मीडियम स्कूल व ज्युनिअर कॉलेज येथे महात्मा गांधी व...

read more
[hsas-shortcode group="" speed="10" direction="left" gap="50"]