loader image
[ays_poll id=7]

फलक रेखाटण : “राष्ट्रीय कला दिन”, विख्यात चित्रकार, राजा रवी वर्मा यांची जयंती

Apr 28, 2022



आधुनिक भारतीय चित्रकलेचे जन्मदाते ,तैल रंग माध्यमात चित्र काढणारे प्रथम भारतीय विख्यात चित्रकार, राजा रवी वर्मा यांची जयंती.

आज सर्व विश्वात ज्या हिंदूं देवी- देवतांच्या प्रतिमेची सर्वजण मनोभावे पूजा अर्चना करत आहे त्या हिंदूं देवी – देवतांना मनमोहक चेहरा व रूप देणारे ‘चित्रकलेचे पितामह’ राजा रवी वर्मा यांचा जन्मदिन.
केरळ मध्ये किलिमानूर शहरात 29 एप्रिल 1848 रोजी राजा रवी वर्मा यांचा जन्म झाला. पौराणिक हिंदूं महाकाव्य व धर्मग्रंथावरील त्यांची चित्रे विशेष लोभस व आकर्षक आहेत. भारतीय साहित्य व संस्कृती मधील पात्रांचे आकर्षक चित्रण त्यांनी केले.महालात व संग्रहालयात उच्चभ्रू लोकांपर्यंतच् आपली चित्रे सिमित राहू नये व ती सर्व साधारण लोकांपर्यंत पोहचावीत म्हणून त्यांनी भारतात पहिली ‘ लिथोग्राफिक प्रेस ‘ सुरु केली. त्यात त्यांची चित्रे छापुन सर्व घरापर्यंत पोहचली. मंदिरातिल देवी – देवतांना बाहेर आणले व चित्र स्वरूपात प्रत्येक घरा घरा मध्ये स्थान प्राप्त करून दिले.
चित्रकलेत त्यांनी नवनवीन प्रयोग व अध्ययन केले. वडोदरा(गुजरात)येथील लक्ष्मीविलास पॅलेस संग्रहालयात त्यांची अनेक चित्रे संग्रहित आहेत. भारतीय चित्रकलेला विश्वामध्ये शिखरावर स्थान निर्माण करून देणाऱ्या चित्रकलेच्या या राजाला रंगीत खडू माध्यमातील फलक रेखाटनातून विनम्र अभिवादन !

  • देव हिरे. ( कला शिक्षक ,’शिक्षण मंडळ भगूर ‘ संचालित, नूतन माध्यमिक विद्यालय,भाटगाव. ता. चांदवड. जि. नाशिक.)

अजून बातम्या वाचा..

त्र्यंबकेश्वर येथे वार्तांकनासाठी गेलेल्या तीन पत्रकारांवर गावातील काही गुंडांनी भ्याड हल्ला

त्र्यंबकेश्वर येथे वार्तांकनासाठी गेलेल्या तीन पत्रकारांवर गावातील काही गुंडांनी भ्याड हल्ला

मनमाड (प्रतिनिधी), ता. २० – त्र्यंबकेश्वर येथे वार्तांकनासाठी गेलेल्या तीन पत्रकारांवर गावातील...

read more
मनमाडच्या प्रगती बँकेला महाराष्ट्र स्टेट अर्बन को-ऑप बँक्स फेडरेशनचा राज्यस्तरीय प्रथम क्रमांकाचा सर्वोत्कृष्ट बँक पुरस्कार

मनमाडच्या प्रगती बँकेला महाराष्ट्र स्टेट अर्बन को-ऑप बँक्स फेडरेशनचा राज्यस्तरीय प्रथम क्रमांकाचा सर्वोत्कृष्ट बँक पुरस्कार

  मनमाड - शहरात गेली 29 वर्ष कार्यरत असलेली व मनमाड शहराची अर्थ वाहिनी असलेल्या प्रगती अर्बन...

read more
.