loader image
[ays_poll id=7]

संपूर्ण राज्यात उन्हाचा पारा चढताच; पुढील ५ दिवसात येऊ शकते उष्णतेची तीव्र लाट

Apr 29, 2022

महाराष्ट्रात मे महिन्याच्या सुरूवातीलाच उष्णतेच्या लाटेचे संकेत देण्यात आले आहेत. भारतीय हवामान विभागाने येत्या ५ दिवसांमध्ये उष्णतेच्या लाटेचा अलर्ट दिला आहे. विदर्भातील काही भागांमध्ये उष्णतेची तीव्र लाट येण्याचा इशारा आयएमडीने दिला आहे. तर आज दक्षिण मध्य महाराष्ट्र आणि दक्षिण कोकणच्या काही भागांमध्ये मेघगर्जनेसह पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.
येत्या ५ दिवसांमध्ये उष्णतेच्या लाटेचा इशारा हवामान विभागाने दिलेला आहे. आगामी ३० एप्रिल ते २ मे या कालावधीत विदर्भात उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे. मे महिन्याच्या सुरूवातीलाच अकोला, यवतमाळ, वर्धा, चंद्रपूर आणि नागपूर या भागामध्ये उष्णतेच्या लाटेचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. त्याआधी अकोला, यवतमाळ, वर्धा, नागपूर आणि चंद्रपूर या जिल्ह्यांना उष्णतेच्या लाटेसाठी सावधानतेचा यलो अलर्ट देण्यात आला आहे.

महाराष्ट्रात अनेक भागात उन्हाच्या पाऱ्याने चाळीशी गाठली आहे. अनेक ठिकाणी सरासरी तापमान हे ४० डिग्री सेल्सिअस इतके आहे. सर्वाधिक अशा तापमानाची नोंद ही ब्रम्हपूरी, वर्धा, अकोला आणि जळगाव येथे झाली आहे. याठिकाणी तापमानाचा पारा हा ४५ डिग्री सेल्सिअसपेक्षा अधिक होता. राज्यात अकोल्यात सर्वाधिक अशी ४५.४ इतकी तापमानाची नोंद झाली. याठिकाणी ०.६ डिग्री सेल्सिअस अशी एकाच दिवसात झालेली वाढ आहे. विदर्भात सर्वाधिक अशा तापमानाची नोंद अनेक जिल्ह्यात झाली आहे. विदर्भातील सर्वच जिल्ह्यात ४० डिग्री सेल्सिअसपेक्षा अधिक अशी तापमानाची नोंद झालेली आहे.

अजून बातम्या वाचा..

अशोका मेडीकव्हर हॉस्पिटल्सचा आरोग्य व्यावसायिकांच्या समर्थनार्थ देशव्यापी आंदोलनात सहभाग

अशोका मेडीकव्हर हॉस्पिटल्सचा आरोग्य व्यावसायिकांच्या समर्थनार्थ देशव्यापी आंदोलनात सहभाग

नाशिक, १७ ऑगस्ट – अशोका मेडिकव्हर हॉस्पिटल्सचा इंडियन मेडिकल असोसिएशन पुकारलेल्या देशव्यापी...

read more
कवी रबिंद्रनाथ टागोर हायस्कूल अँड ज्यु. काॅलेज, मनमाड येथे ७८ वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा करण्यात आला

कवी रबिंद्रनाथ टागोर हायस्कूल अँड ज्यु. काॅलेज, मनमाड येथे ७८ वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा करण्यात आला

बातमी : दिनांक: १५/०८/२०२४ . शाळेच्या परंपरेनुसार इयत्ता 10 वी मध्ये शाळेत प्रथम येणा-या...

read more
मनमाड – महामाया महिला मंडळाच्यावतीने बुधलवाडी येथील कपिल वस्तू बुद्ध विहारात भारतीय स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा करण्यात आला

मनमाड – महामाया महिला मंडळाच्यावतीने बुधलवाडी येथील कपिल वस्तू बुद्ध विहारात भारतीय स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा करण्यात आला

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महामाया महिला मंडळाच्या अध्यक्षा अलकबाई केदारे होत्या. प्रारंभी...

read more
एच.ए.के.हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज,मनमाड मध्ये स्वातंत्र्य दिन मोठया उत्साहात साजरा

एच.ए.के.हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज,मनमाड मध्ये स्वातंत्र्य दिन मोठया उत्साहात साजरा

मनमाड : एच.ए.के.हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज मध्ये संस्थेच्या सदस्य आयशा सलीम गाजीयानी यांच्या...

read more
अशोका मेडिकव्हर हॉस्पिटल्सची स्वातंत्र्यदिना निमित्त नागरिकांसाठी विशेष आरोग्य पॅकेज

अशोका मेडिकव्हर हॉस्पिटल्सची स्वातंत्र्यदिना निमित्त नागरिकांसाठी विशेष आरोग्य पॅकेज

अशोका मेडिकव्हर हॉस्पिटल्सची स्वातंत्र्यदिना निमित्त नागरिकांसाठी विशेष आरोग्य पॅकेज नाशिक, १५...

read more
.