loader image

नांदगाव शहर व तालुक्यात महात्मा बसवेश्वर जंयती मोठया उत्साहात साजरी

May 4, 2022


नांदगाव शहर व तालुक्यात महात्मा बसवेश्वर जंयती मोठया उत्साहात साजरी
विरशैव लिंगायत समाजाचे धर्म प्रसारक क्रांतीसुर्य जगतज्योती महात्मा बसवेश्वर यांची जंयती नांदग़ाव शहरातील सर्व शासकीय कार्यालयात मोठया उत्साहात साजरी करण्यात आली शहरातील तहसिल कार्यालयात महसुल सहाय्यक श्रीमती संगीता राठोड यांच्या हस्ते बसवेश्वरांच्या प्रतिमेस हार घालून पुजा करून साजरी करण्यात आली तर पंचायत समिती मध्ये गटविकास अधिकारी गणेश चौधरी यांच्या हस्ते तर नगरपालिकेत बांधकाम विभागाचे अरूण निकम,देवकर यांच्या उपस्थीतीत महेद्र घोंगाणे यांच्या हस्ते प्रतिमेचे पुजन करण्यात आले. सहाय्यक निबंधक कार्यालयात विघ्नेसाहेब, भाऊसाहेब आहिरे,अमोल खेरणार यांच्या उपस्थितीत सोमनाथ घोंगाणे यांच्या हस्ते प्रतिमेस हार घालून पुजन करण्यात आले व पेढे वाटण्यात आले. उपअधिक्षक भुमी अभिलेक कार्यालयात मुख्यालय सहाय्यक श्रीमती चव्हाण मॅडम,पाटील मॅडम, काकड,भाऊसाहेब जाधव यांच्या उपस्थितीत सोमनाथ घोंगाणे व अनील धामणे यांच्या हस्ते प्रतिमेस हार घालून पुजन करण्यात आले तसेच पेढे वाटण्यात आले .
नांदगाव पोलिस स्टेशन येथे सहाय्यक पो. नि. सुरवाडकर साहेब यांच्या हस्ते महात्मा बसवेश्र्वर याच्यां प्रतिमेचे पुजन करण्यात आले यावेळी सोमनाथ घोंगाणे, मनोज वाघ, दिपक मुडें,सोनवणे दादा यांच्या सह पोलिस स्थानकातील कर्मचारी उपस्थित होते यावेळी सोमनाथ घोंगाणे यांनी महात्मा बसवेश्र्वर महाराजांची प्रतिमा पोलिस स्थानकास भेट दिली.
तसेच महात्मा बसवेश्वर यांच्या कार्याची माहीती उपस्थितांना दिली.


अजून बातम्या वाचा..

.