loader image
[ays_poll id=7]

मध्यप्रदेशातही होणार ओबीसी आरक्षणाशिवाय स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका : सर्वोच्च न्यायालयाने दिले आदेश

May 10, 2022

ओबीसी आरक्षणाचं जे महाराष्ट्रात झालं तेच मध्य प्रदेशातही झालं असून स्थानिक स्वराज्य निवडणुकांमध्ये तूर्तास ओबीसी आरक्षण लागू होणार नाही. ट्रिपल टेस्टवर आधारित रिपोर्ट सादर करु न शकल्याने सर्वोच्च न्यायालयाने हे आदेश दिले आहेत.
मध्य प्रदेशात भाजपचं सरकार आहे. त्यामुळे तिथे काय निर्णय घेतला जातो याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागलेलं होतं. कारण जर मध्य प्रदेशचा रिपोर्ट मान्य झाला असता तर ट्रिपल टेस्टवर आधारित रिपोर्ट कसा सादर करायचा याचा एक धडा इतर राज्यांना मिळाला असता. पण देशात कुठलंच राज्य आतापर्यंत ट्रिपल टेस्टवर आधारित रिपोर्ट सादर करु शकलेलं नाही.
त्यामुळे आता मध्य प्रदेशातही दोन आठवड्यांमध्ये निवडणूक प्रक्रिया सुरु करण्याचे आदेश सु्प्रीम कोर्टाने दिले आहेत. मध्य प्रदेशात जवळपास २१ हजार पेक्षा जास्त स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये निवडणूक प्रलंबित आहे. पाच वर्षांपेक्षा अधिक काळ निवडणूक प्रलंबित ठेवणं हे घटनेला धरुन नाही, असं कोर्टाने म्हटलं आहे.
मागच्याच आठवड्यात महाराष्ट्राच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका संदर्भात असाच निकाल सुप्रीम कोर्टाने दिला होता. दोन आठवड्यांत निवडणूक प्रक्रिया सुरु करण्याचे आदेश कोर्टाने दिले होते. ही प्रक्रिया दोन ते अडीच महिन्यांत पूर्ण होऊन साधारण पावसाळ्यानंतर निवडणूक जाहीर होण्याची शक्यता आहे.
आजच्या निकालाने दोन गोष्टी स्पष्ट झाल्यात. एक म्हणजे कार्यकाळ पूर्ण झाल्यानंतर तातडीने निवडणुका घ्यायला कोर्टानं सांगितलं आहे. दुसरं म्हणजे ट्रिपल टेस्ट पूर्ण नाही, त्यामुळे तूर्तास या निवडणुका ओबीसी आरक्षणाशिवायच घेण्याचा कोर्टाचा आदेश आहे. आता निवडणुकांसाठी अवघ्या दोन तीन महिन्यांचा अवधी उरलेला असताना त्याआधी सुप्रीम कोर्टात असा ट्रिपल टेस्टवर आधारित सक्षम रिपोर्ट सादर करणं हा एकमेव पर्याय राज्य सरकारसमोर आहे.

महाराष्ट्र, झारखंड पाठोपाठ आता मध्य प्रदेशातही कोर्टाने ओबीसी आरक्षणाशिवायच निवडणुका घेण्याचे आदेश दिले आहेत. आता या सगळ्या प्रकरणात पुढची सुनावणी १२ जुलैला होणार आहे. त्यामुळे तोपर्यंत ट्रिपल टेस्टच्या पूर्ततेसाठी काय पावलं उचलली जातात यावर आरक्षणाचं भवितव्य अवलंबून असेल.

अजून बातम्या वाचा..

मुकुंद आहेर,साईराज परदेशी,तृप्ती पाराशर यांची राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेसाठी निवड

मुकुंद आहेर,साईराज परदेशी,तृप्ती पाराशर यांची राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेसाठी निवड

उत्तराखंड येथे सुरू होणाऱ्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेसाठी मनमाडच्या मुकुंद संतोष आहेर साईराज राजेश...

read more
वेशीतील श्री निलमणी गणेश मंदिरात श्री गणेश जयंती (तिलकुंद चतुर्थी)( माघ शुद्ध चतुर्थी)

वेशीतील श्री निलमणी गणेश मंदिरात श्री गणेश जयंती (तिलकुंद चतुर्थी)( माघ शुद्ध चतुर्थी)

माघी श्री महागणेश जन्मोत्सव निमित्ताने 1997 पासून अखंडितपणे सलग 29 व्या वर्षी यंदाही शनिवार दिनांक...

read more
के आर टी हायस्कूल अँड ज्युनियर कॉलेजमध्ये नेताजी सुभाष चंद्र बोस यांची जयंती साजरी

के आर टी हायस्कूल अँड ज्युनियर कॉलेजमध्ये नेताजी सुभाष चंद्र बोस यांची जयंती साजरी

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे प्राचार्य मुकेश मिसर यांनी नेताजी सुभाष चंद्र बोस यांच्या...

read more
एच.ए.के.हायस्कूल अँड ज्यु.कॉलेज,मनमाड मध्ये नेताजी सुभाषचंद्र बोस व बाळासाहेब ठाकरे जयंती साजरी.

एच.ए.के.हायस्कूल अँड ज्यु.कॉलेज,मनमाड मध्ये नेताजी सुभाषचंद्र बोस व बाळासाहेब ठाकरे जयंती साजरी.

  मनमाड :-एच.ए.के.हायस्कूल अँड ज्यु.कॉलेज,मनमाड मध्ये नेताजी सुभाषचंद्र बोस व शिवसेना...

read more
रोटरी क्लब मनमाड तर्फे पीएम श्री केंद्रीय विद्यालय मध्य रेल्वे मनमाड येथे आरोग्य तपासणी शिबिर संपन्न

रोटरी क्लब मनमाड तर्फे पीएम श्री केंद्रीय विद्यालय मध्य रेल्वे मनमाड येथे आरोग्य तपासणी शिबिर संपन्न

पीएम श्री केंद्रीय विद्यालय मध्य रेल्वे मनमाड येथे रोटरी क्लब मनमाड व मनमाड शहरातील नामांकित...

read more
मनमाड महाविद्यालयात ‘मराठी वाचन कट्टा’ सुरु  व्यक्तिमत्त्व विकासासाठी विद्यार्थ्यांनी पुस्तकांशी मैत्री करणे आवश्यक आहे  – प्राचार्य डॉ. अरुण पाटील

मनमाड महाविद्यालयात ‘मराठी वाचन कट्टा’ सुरु व्यक्तिमत्त्व विकासासाठी विद्यार्थ्यांनी पुस्तकांशी मैत्री करणे आवश्यक आहे – प्राचार्य डॉ. अरुण पाटील

  मनमाड (नाशिक) – महात्मा गांधी विद्यामंदिर संचालित, कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयात...

read more
.