Breaking News

[post-marguee]

[ays_poll id=7]

नांदगावला दुचाकी व कार ची समोरासमोर धडक : एक ठार, दोन जखमी

May 20, 2022

नांदगाव – औरंगाबाद रस्त्यावरील रेल्वे उड्डाण पुलाजवळ मोटार सायकल व टोयोटो कंपनीची कार यांच्यात अपघात होवून एक जणाचे  दवाखान्यात नेत असताना निधन झाले तर एक जण गंभीर जखमी झाला
याबाबत वृत असे की नांदगाव शहरा जवळील रेल्वे उड्डाण पुलाजवळ मोटार सायकल व टोयोटो कंपनीची कार एम . एच . १५ डी एस ९३९० यांच्यात समोरा समोर अपघात होवून मोटार सायकल चालक समाधान जगंलू गायकवाड ( रा. इंदीरानगर कळमधरी) यांचे मालेगाव येथे दवाखान्यात नेत असतानां निधन झाले तर मागे बसलेला विलास शंकर धोत्रे हा गंभीर जखमी झाला असून त्यास मालेगाव येथे दवाखान्यात भरती केले आहे. अपघात होताच मोटारसायकल हवेत उंच उडाली व तिने पेट घेतला यामध्ये मोटारसायकल जळून पुर्ण खाक झाली . कारचालक घनश्याम हनुमंत निकम रा पंचवटी नाशिक हे जखमी झाले असून त्यांच्यांवर नांदगाव ग्रामीण रूग्णालयात उपचार चालू आहे.
नांदगाव पोलीस ठाण्यात अपघाताचा गुन्हा दाखल झाला असून पुढील पो. नि. रामेश्वर गाडे यांच्या मार्गदर्शना खाली पो. ह. राजू मोरे हे करीत आहे.

अजून बातम्या वाचा..

संकष्ट चतुर्थी निमित्त शनिवार दि. १६ जुलै रोजी वेशीतील श्री निलमणी गणेश मंदिरात धार्मिक कार्यक्रम

संकष्ट चतुर्थी निमित्त शनिवार दि. १६ जुलै रोजी वेशीतील श्री निलमणी गणेश मंदिरात धार्मिक कार्यक्रम

मनमाड शहराचे आराध्य दैवत आणि नवसाला पावणारा गणपती म्हणून पंचक्रोशीत प्रसिद्ध असणाऱ्या वेशीतील श्री...

read more
मनमाड सार्वजनिक वाचनालया तर्फे अण्णाभाऊ साठे व लोकमान्य टिळक यांच्या स्मृति दिना निमित्ताने आंतरशालेय निबंध, कथाकथन व वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन

मनमाड सार्वजनिक वाचनालया तर्फे अण्णाभाऊ साठे व लोकमान्य टिळक यांच्या स्मृति दिना निमित्ताने आंतरशालेय निबंध, कथाकथन व वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन

मनमाड - मनमाड सार्वजनिक वाचनालयाच्या वतीने स्व.अण्णाभाऊ साठे व लोकमान्य टिळक यांच्या...

read more
मनमाड महाविद्यालयात डॉ स्मिताताई प्रशांत हिरे यांच्या वाढदिवसानिमित्त हिमोग्लोबिन व थायरॉईड तपासणी शिबिर संपन्न

मनमाड महाविद्यालयात डॉ स्मिताताई प्रशांत हिरे यांच्या वाढदिवसानिमित्त हिमोग्लोबिन व थायरॉईड तपासणी शिबिर संपन्न

मनमाड: महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय मनमाड येथे आज दिनांक 14...

read more
[hsas-shortcode group="" speed="10" direction="left" gap="50"]