Breaking News

[post-marguee]

[ays_poll id=7]

नांदगावला दुचाकी व कार ची समोरासमोर धडक : एक ठार, दोन जखमी

May 20, 2022

नांदगाव – औरंगाबाद रस्त्यावरील रेल्वे उड्डाण पुलाजवळ मोटार सायकल व टोयोटो कंपनीची कार यांच्यात अपघात होवून एक जणाचे  दवाखान्यात नेत असताना निधन झाले तर एक जण गंभीर जखमी झाला
याबाबत वृत असे की नांदगाव शहरा जवळील रेल्वे उड्डाण पुलाजवळ मोटार सायकल व टोयोटो कंपनीची कार एम . एच . १५ डी एस ९३९० यांच्यात समोरा समोर अपघात होवून मोटार सायकल चालक समाधान जगंलू गायकवाड ( रा. इंदीरानगर कळमधरी) यांचे मालेगाव येथे दवाखान्यात नेत असतानां निधन झाले तर मागे बसलेला विलास शंकर धोत्रे हा गंभीर जखमी झाला असून त्यास मालेगाव येथे दवाखान्यात भरती केले आहे. अपघात होताच मोटारसायकल हवेत उंच उडाली व तिने पेट घेतला यामध्ये मोटारसायकल जळून पुर्ण खाक झाली . कारचालक घनश्याम हनुमंत निकम रा पंचवटी नाशिक हे जखमी झाले असून त्यांच्यांवर नांदगाव ग्रामीण रूग्णालयात उपचार चालू आहे.
नांदगाव पोलीस ठाण्यात अपघाताचा गुन्हा दाखल झाला असून पुढील पो. नि. रामेश्वर गाडे यांच्या मार्गदर्शना खाली पो. ह. राजू मोरे हे करीत आहे.

अजून बातम्या वाचा..

यंत्रणेलाच माहिती नाही तर सामान्य नागरिकांना लाभ कुठून देणार? – आढावा बैठकीत ना.भारती पवार यांनी व्यक्त केला संताप !

तालुक्यातील महसूल व पंचायत समितीच्या यंत्रणेलाच जर केंद्र सरकारच्या जनकल्याणकारी योजनांची माहिती...

read more

चांदवड ते मनमाड रस्त्याचे कॉक्रीटीकरण आराखड्यात बदल करावे : चांदवड वासियांचे निवेदन !

चांदवड सबस्टेशन ते महामार्ग चौफुली या रस्त्याच्या आराखड्यात बदल करणे बाबत व नागरिकांना होणाऱ्या...

read more
[hsas-shortcode group="" speed="10" direction="left" gap="50"]