loader image

अशोका मेडिकव्हर हॉस्पिटल मध्ये ओपन हार्ट सर्जरी न करता  IVL तंत्रज्ञानाने हृदयशस्त्रक्रिया यशस्वी – डॉ. सचिनकुमार पाटील

Jun 15, 2022


नाशिक | प्रतिनिधी : ओपन हार्ट सर्जरीला पर्यायी ” शॉक वेव्ह इंट्रा व्हॅस्क्युलर बलून लिथोट्रिप्सी ” या अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या साहाय्याने अशोका मेडिकव्हर हॉस्पिटल येथे मछिंद्र त्रिभुवन (वय वर्ष ६३ सातपूर ,नाशिक ) यांच्यावर इंटरव्हेन्शल कार्डिओलॉजिस्ट डॉ सचिनकुमार पाटील यांनी यशस्वी उपचार केले.या यशाबद्दल अशोका मेडिकव्हर हॉस्पीटलचे  मेडिकल डायरेक्टर डॉ.सुशील पारख , केंद्र प्रमुख समीर तुळजापूरकर यांनी डॉक्टर आणि टीमचे अभिनंदन केले आहे.

रुग्ण मछिंद्र त्रिभुवन (वय वर्ष ६३ सातपूर ,नाशिक ) हार्ट फेल्युअर ची लक्षण घेऊन रुग्णालयात उपचारासाठी दाखल झाले होते.यापूर्वी हि रुग्णावर २००८ साली अँजिओप्लास्टी व २०१६ साली बायपास हि शस्त्रक्रिया करण्यात आली होती.काही वर्ष कुठलाही त्रास जाणवला नाही परंतु गेल्या काही दिवसापासून त्यांना  चालताना श्वास घेण्यास त्रास आणि रात्री झोपण्यास त्रास जाणवत होता.रुग्णाला मधुमेह,मूत्रपिंड विकार सोबत सह-व्याधी होत्या आणि रुग्णाला महिन्यातून दोन वेळेस रुग्णालयात दाखल करावे लागत होते. पुढील निदान व उपचारासाठी डॉ सचिनकुमार पाटील यांनी अँजिओग्राफी करण्याचा सल्ला रुग्णाला देण्यात आला.अँजिओग्राफी करते वेळी असे लक्षात आले कि, हृदयाला रक्त पुरवठा करणाऱ्या धमन्यांमध्ये  ३  पैकी २   धमन्यांमध्ये १०० % अडथळा निर्माण झाला आहे आणि त्यामुळे हृदयाला योग्य पद्धतीने रक्तपुरवठा होत नव्हता , रक्तपुरवठा करणाऱ्या धमन्यां मध्ये  कॅल्शियम युक्त प्लाक असल्याचे लक्षात आले व त्यांना बायपास या शस्त्रक्रियेची गरज असल्याचे निदान करण्यात आले परंतु या पूर्वी झालेल्या हृदयावरील शस्त्रक्रिया आणि  इतर व्याधी मुळे हृदयाचे आकुंचन प्रसरण पावण्याची कमी झालेली क्षमता याचा विचार करून बायपास करणे हे धोक्याचे आहे असे सांगण्यात आले, त्यांच्याशी व त्यांच्या नातेवाईकांशी चर्चा करून त्यांच्यावर शॉक वेव्ह इंट्रा व्हॅस्क्युलर बलून लिथोट्रिप्सी या तंत्रज्ञानाचा उपयोग करून हृदय शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेतला. हि शस्रक्रिया १० जून २०२२ रोजी यशस्वीरीत्या पार पाडण्यात आली

डॉ सचिनकुमार पाटील यांनी सांगितले कि, अशा प्रकारची गुंतागुंतीची शस्त्रक्रिया करण्यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाबरोबरच उत्तम कॅथलॅब , सर्पोटिव्ह स्टाफ आणि  इतर कोणत्याही इमर्जन्सी निर्माण झाल्यास लागणारी सुविधा उपलब्ध असणे गरजेचे असते.  अशा सर्व सुविधा अशोका मेडिकव्हर  हॉस्पिटलमध्ये उपलब्ध आहे. IVL ( शॉक वेव्ह इंट्राव्हॅस्क्युलर बलून लिथोट्रिप्सी ) व IVUS इंटरवस्कुलर अल्ट्रासाऊंड या अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने हि अँजिओप्लास्टी  करण्यात आली. हे तंत्रज्ञान हृदयविकार रुग्णांसाठी एक संजीवनी आहे असं म्हणायला हरकत नाही.  जगभरात आता या तंत्रज्ञाच्या साहाय्याने रुग्णावर यशस्वी  उपचार केले जात आहेत.रक्तवाहिन्यांच्या धमन्यामधील  कॅल्शियमचा थर हटवण्यासाठी  जिथे अडथळा आहे.  तिथे अत्यंत गतिशील अशा सोनिक प्रेशर लाहिरी तयार करण्यात येतात.   जेव्हा क्रिया सुरु असते तेव्हा  विद्युत  ऊर्जा हि यांत्रिक ऊर्जेत मध्ये बदलली जाते आणि रक्तवाहिन्यांतील असलेला अडथळा हटवला जातो. जे रुग्ण वृध्द आहेत ज्यांना मुत्रपिंडाचा, फुफ्फुसाचा किंवा मधुमेहाचा त्रास आहे, ज्या रुग्णांमध्ये पूर्वी हृदय रोग  वरील शस्त्रक्रिया झाली आहे,  अशा  रुग्णाला निदान झाल्यानंतर या  शस्त्रक्रियेचा सल्ला दिला जातो . या शस्त्रक्रियेमध्ये रुग्णाला कमीत कमी त्रास होतो. छाती उघडली जात नसल्याने रुग्णास सामान्य भुल देणे गरजेचे नसते. शस्त्रक्रियेनंतर कोणताही मोठा व्रण राहत नाही. रुग्ण अगदी ४-५ दिवसात डिस्चार्ज घेवून घरी जावू शकतो. व शस्त्रक्रियेनंतर डॉक्टरांनी दिलेली औषधे व काही खबरदारीचे उपाय घेतल्यास रुग्ण सामान्य व आनंदी जीवन जगू शकतो
————————————————————————— 

हॉस्पिटल  मध्ये प्रशिक्षित तज्ज्ञांकडून एकाच छताखाली अचूक निदान व उपचार  केले जातात.अत्यधुनिक सुविधा आणि तंत्रज्ञानाची जोड असल्याने अशोक मेडिकव्हर हॉस्पिटल रुग्णांसाठी सर्वसमावेशक पर्याय म्हणून कार्यरत आहे
समीर तुळजापूरकर
केंद्रप्रमुख


अजून बातम्या वाचा..

सातत्य पूर्ण रक्तदान शिबिराचे संयोजक म्हणून नितीन पांडे यांचा जनकल्याण रक्तकेंद्र नाशिक तर्फे सन्मान 

सातत्य पूर्ण रक्तदान शिबिराचे संयोजक म्हणून नितीन पांडे यांचा जनकल्याण रक्तकेंद्र नाशिक तर्फे सन्मान 

जनकल्याण रक्तकेंद्राच्या ३६ वा वर्धापन दिनानिमित्त शंकराचार्य संकुल गंगापूर रोड येथे शिबीर...

read more
के आर टी हायस्कूल मध्ये इयत्ता तिसरी ते चौथीच्या दोनशे विद्यार्थ्यांनी एकत्र येऊन अतिशय सुंदर अशी श्री गणेशाची मानवी प्रतिमा साकारली

के आर टी हायस्कूल मध्ये इयत्ता तिसरी ते चौथीच्या दोनशे विद्यार्थ्यांनी एकत्र येऊन अतिशय सुंदर अशी श्री गणेशाची मानवी प्रतिमा साकारली

दिनांक 26/8/2025 रोजी के आर टी हायस्कूल मध्ये इयत्ता तिसरी ते चौथीच्या दोनशे विद्यार्थ्यांनी एकत्र...

read more
भाटगाव विद्यालयातील अनोखा उपक्रम. पिंपळ पानावर श्रीगणेशाचे विविध रुपे चित्र रेखाटून विघ्नहर्त्याचे स्वागत…!

भाटगाव विद्यालयातील अनोखा उपक्रम. पिंपळ पानावर श्रीगणेशाचे विविध रुपे चित्र रेखाटून विघ्नहर्त्याचे स्वागत…!

आज दि.२६ ऑगस्ट २०२५ रोजी शिक्षण मंडळ भगूर संचालित नूतन माध्यमिक विद्यालय...

read more
मनमाड शहराचे आराध्य दैवत व नवसाला पावणाऱ्या वेशीतील श्री निलमणी गणेश मंदीरात 1997 पासून सलग 29 व्या वर्षी यंदा 11 दिवस भाद्रपद महागणेशोत्सव

मनमाड शहराचे आराध्य दैवत व नवसाला पावणाऱ्या वेशीतील श्री निलमणी गणेश मंदीरात 1997 पासून सलग 29 व्या वर्षी यंदा 11 दिवस भाद्रपद महागणेशोत्सव

मनमाड - बुधवार दिनांक 27 /08/2025 रोजी भाद्रपद शुध्द श्री गणेश चतुर्थी निमित्त सकाळी ठीक 09-30...

read more
मनमाड शहर भाजपा मंडल तर्फे 79 व्या स्वातंत्र्य दिना निमित्ताने ध्वजारोहण कार्यक्रम व भव्य तिरंगा रॅली चेआयोजन युवकांचा उस्फुर्त प्रतिसाद

मनमाड शहर भाजपा मंडल तर्फे 79 व्या स्वातंत्र्य दिना निमित्ताने ध्वजारोहण कार्यक्रम व भव्य तिरंगा रॅली चेआयोजन युवकांचा उस्फुर्त प्रतिसाद

भारतीय जनता पार्टी मनमाड शहर मंडलाच्या वतीने स्वतंत्र हिंदुस्थान च्या 79 व्या स्वातंत्र्य दिना...

read more
मनमाड येथील सेंट झेवियर हायस्कूलमध्ये भारतीय स्वातंत्र्य दिनाचा सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न

मनमाड येथील सेंट झेवियर हायस्कूलमध्ये भारतीय स्वातंत्र्य दिनाचा सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न

मनमाड येथील सेंट झेवियर हायस्कूलमध्ये भारतीय स्वातंत्र्य दिनाचा सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला....

read more
.