मनमाड शहरातील प्रगती बँकेची पंचवार्षिक निवडणूक येत्या १७ जुलै रोजी होणार असून संचालक मंडळाच्या १५ जागांसाठी ३५ जणांनी अर्ज दाखल केले आहेत.मंगळवारी उपनिबंधक कार्यालयात झालेल्या छाननीत सर्व अर्ज वैध ठरविण्यात आले.सर्वसाधारण १० जागांसाठी २३ अर्ज, त्यात दोन महिला राखीव जागांसाठी चार, अनुसूचित – जाती जमाती एक जागेसाठी दोन अर्ज दाखल करण्यात आले आहेत. इतर मागासवर्ग एक जागेसाठी तीन उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत तर भटक्या विमुक्त एका जागेसाठी तीन अर्ज दाखल करण्यात आले आहेत.माघारीची मुदत २२ जून ते ६ जुलै पर्यंत असून माघारी नंतर अंतिम यादी व निशाणी वाटप ७ जुलै रोजी होणार आहे.
SNJB ला महिंद्रा अँड महिंद्रा तर्फे बोलेरो न्युओ ऍम्बुलन्स भेट
श्री नेमिनाथ जैन ब्रम्हचर्याश्रम (जैन गुरुकुल) SNJB चांदवड या संस्थेच्या आयुर्वेद ऍन्ड...











