Breaking News

[post-marguee]

[ays_poll id=7]

पहिल्याच दिवशी मनमाड रेल्वे स्थानकात सर्वसाधारण प्रवाशी तिकीटाची साडेसात लाखाची विक्री

Jul 1, 2022

सुमारे अडीच वर्षानंतर रेल्वेची प्रवाशांसाठी सर्वसाधारण तिकिट सेवा बुधवारपासून सुरू झाली . आणि पहिल्याच दिवशी जनरल तिकिटाच्या विक्रीतून मनमाड रेल्वे स्थानकाला ७ लाख ६३,८१५ इतका महसूल प्राप्त झाला . आता दिवसा गणिक रेल्वेच्या उत्पादनात जास्त महसूल , मिळणार आहे . रेल्वेची सर्वसाधारण तिकिट विक्री सुरू झाल्याने प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला . मध्यरात्रीपासून अडीच वर्षापासून बंद असलेले सर्वसाधारण तिकिट काऊंटर खुले झाले . आणि या तिकिटासाठी पहिल्या दिवशी प्रवाशांच्या रांगा दिसून आल्या दिवसभरातील २४ तासात ‘ विविध राज्यात परराज्यात जाणाऱ्या ३७४१ प्रवाशांनी ३०७८ तिकिटे खरेदी केली . त्याद्वारे रेल्वेला पहिल्याच दिवशी ७ लाख ६३ हजार रूपये इतके उत्पन्न मिळाले . आज सलग दुसऱ्या दिवशी गुरूवारी सर्वसाधारण खिडकी समोर प्रवाशांच्या रांगा दिसून आल्या .

उत्तर महाराष्ट्राचे प्रवेशद्वार आणि मध्य रेल्वेचे प्रमुख जंक्शन स्टेशन असलेल्या मनमाड रेल्वे स्थानकांत बुधवारपासून रेल्वेचे जनरल तिकीट सुरू झाल्यामुळे प्रवाशांनी सुटकेचा निश्वास सोडला . आता कधीही ऐनवेळी तिकीट काढून रेल्वे प्रवास करणे सुलभ होणार असल्याने प्रवाशांनी समाधान व्यक्त केले . आज पहिल्याच दिवशी रेल्वेच्या तिकीट विक्री खिडकीवर बऱ्यापैकी प्रतिसाद मिळाला . यम कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर बंद करण्यात आलेली रेल्वेची जनरल तिकीट सेवा तब्बल अडीच वर्षानंतर बुधवारी मध्यरात्रीपासून सुरू झाली . इतके दिवस बंद असलेल्या तिकीटाच्या खिडक्या आज खुल्या झाल्या त्यामुळे जनरल तिकीट घेवून कधीही मेल आणि एक्सप्रेस रेल्वेमधून प्रवाशांना आता प्रवास करता येणार आहे . मनमाड जंक्शन रेल्वे स्थानकांतून दररोज २४ तासात १२० वर मेल एक्सप्रेस धावतात . तर १२ हजार प्रवाशांचे आवागमन होते . या सर्वच प्रवाशांना जनरल तिकीट सेवेचा लाभ होणार आहे . शिवाय रेल्वेच्या या निर्णयामुळे प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला आहे . यापूर्वी फक्त ठराविक रेल्वेचे जनरल तिकीट आरक्षणाशिवाय मिळत होते .

आता जनरल तिकीटाबरोबरच एटीव्हीएम , अनारक्षित तिकीट काऊंटर , जीटीबीएस , युटीएस आणि मोबाईल अॅपद्वारेही जनरल तिकीट सुविधा दिली जाणार आहे . त्यामुळे आता वेटिंग लिस्ट असलेल्या आणि ऐनवेळी नियोजन करणाऱ्या प्रवाशांसाठी हा मोठा दिलासा मिळणार असून रेल्वे प्रवास आता सोपा होणार आहे . विशेष म्हणजे सर्व मेल एक्सप्रेस रेल्वे गाड्यांचे जनरल तिकीट मिळणार आहे . म्हणजेच तुम्ही आरक्षणाशिवाय ऐनवेळी तिकीट काढून रेल्वे प्रवास करू शकणार आहात . कोरोना काळात खबरदारीचा उपाय म्हणून रेल्वे प्रशासनाने रेल्वे गाड्यांमधील गर्दी टाळण्यासाठी २२ मार्च २०२० पासून रेल्वेचे जनरल तिकीट बंद केले होते .

अजून बातम्या वाचा..

छत्रपती शिवाजी महाराजांच्या १२ किल्ल्यांचा युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांच्या यादीत समावेश

छत्रपती शिवाजी महाराजांच्या १२ किल्ल्यांचा युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांच्या यादीत समावेश

. मनमाड भाजपा तर्फे आनंद जल्लोष कार्यक्रम शिवाजी महाराज यांच्या 12 किल्ल्यांचा युनेस्को च्या...

read more
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या 12 किल्यांना युनेस्कोकडून “मराठा लष्करी भूप्रदेश” म्हणून मानांकन

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या 12 किल्यांना युनेस्कोकडून “मराठा लष्करी भूप्रदेश” म्हणून मानांकन

*छत्रपती शिवाजी महाराज यांच्या 12 किल्यांना युनेस्कोकडून "मराठा लष्करी भूप्रदेश" म्हणून मानांकन...

read more
मनमाड सार्वजनिक वाचनालयातर्फे स्वर्गीय अण्णाभाऊ साठे व स्वर्गीय  लोकमान्य टिळक यांच्या स्मृति दिना निमित्ताने मनमाड शहर पातळीवर आंतरशालेय   निबंध, कथाकथन व वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन

मनमाड सार्वजनिक वाचनालयातर्फे स्वर्गीय अण्णाभाऊ साठे व स्वर्गीय लोकमान्य टिळक यांच्या स्मृति दिना निमित्ताने मनमाड शहर पातळीवर आंतरशालेय  निबंध, कथाकथन व वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन

मनमाड सार्वजनिक वाचनालयातर्फे स्वर्गीय अण्णाभाऊ साठे व स्वर्गीय लोकमान्य टिळक यांच्या स्मृति दिना...

read more
नांदगाव आणि मनमाड शहरात वाढती वाहतूक; वळण रस्त्याची तातडीने गरज – आमदार सुहास कांदे यांची विधानसभेत जोरदार मागणी

नांदगाव आणि मनमाड शहरात वाढती वाहतूक; वळण रस्त्याची तातडीने गरज – आमदार सुहास कांदे यांची विधानसभेत जोरदार मागणी

नांदगाव आणि मनमाड शहरात वाढती वाहतूक; वळण रस्त्याची तातडीने गरज – आमदार सुहास कांदे यांची...

read more
[hsas-shortcode group="" speed="10" direction="left" gap="50"]