loader image
[ays_poll id=7]

राष्ट्रपती निवडणूक आणि ओबीसी आरक्षण : मनमाड भाजपाचा भर पावसात जल्लोष

Jul 21, 2022


भाजपा मनमाड शहर च्या वतीने एन. डी. ए. च्या राष्ट्रपती पदाच्या उमेदवार दौप्रदी मुर्मू यांच्या ऐतिहासिक विजय निमित्ताने तसेच महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज संस्था निवडणूकीत राजकीय ओबीसी आरक्षण लागू झाल्या बद्दल विजयी उत्सव साजरा करण्यात आला. मनमाड शहर भाजपच्या वतीने स्वतंत्र भारताच्या १६ व्या राष्ट्रपती पदावर एन डी ए च्या उमेदवार श्रीमती दौपदी मुर्मू या प्रथम आदिवासी महिला म्हणून प्रचंड मताधिक्याने विजयी झाल्या म्हणून आणि महाराष्ट्र राज्यात आगामी काळात संपन्न होणाऱ्या निवडणूकित ओबीसी आरक्षण लागु झाले हे भाजपा च्या प्रयत्ननांचे यश मिळाले दोन्ही महत्वपूर्ण ऐतिहासिक घटना चा विजयी उत्सव भाजपा नासिक जिल्हा उपाध्यक्ष नितिन पांडे,भाजपा मनमाड शहर अध्यक्ष जयकुमार फुलवाणी ,भाजपा नासिक जिल्हा युवा मोर्चा अध्यक्ष सचिन दराडे, भाजप आर्थिक सेल जिल्हा अध्यक्ष कांतीलाल लुणावत यांचे नेतृत्वाखाली एकात्मता चौकात भर पावसात साजरा करण्यात आला यावेळी फटाक्यांची मोठी आतिषबाजी करण्यात आली भारतीय जनता पार्टी चा विजय असो, भारत माता की जय ,वंदे मातरम, नरेंद्र मोदी तुम आगे बढो देश तुम्हारे साथ है। दौप्रदी मुर्मू तुम आगे बढो ,देवेंद्र फडणवीस तुम आगे बढो अश्या घोषणा नी परिसर दुमदुमून गेला भाजपा ने स्वातंत्र्य च्या अमृत महोत्सवी वर्षांत मोदीजी च्या नेतृत्व मध्ये दौप्रदी मुर्मू यांचे रूपाने प्रथमच एक आदीवासी महिलेला भारताचे प्रथम नागरिक पदा चा बहुमान दिला आहे हा ऐतिहासिक सुवर्ण क्षण आहे असे या प्रसंगी नितीन पांडे यांनी सांगितले तर ओबीसी समाज बांधव हा भाजपा चा आत्मा आहे 2019 पासून आदरणीय देवेंद्रजी च्या नेतृत्वाखाली भाजपा ने ओबीसी राजकीय आरक्षण साठी राज्यात आंदोलन द्वारे मोठा संघर्ष केला आणि त्याचे फल म्हणजे सर्वोच्च न्यायालयाने महाराष्ट्र मष्ये ओबीसी राजकीय आरक्षण लागू केले भाजपच्याच माध्यमातून ओबीसी न्याय मिळाला असे या प्रसंगी जयकुमार फुलवाणी यांनी सांगितले या विजयी उत्सव कार्यक्रमास , भाजपा शहर संघटन सरचिटणीस नितिन परदेशी, एकनाथ बोडखे,जेष्ठ पदाधिकारी निळकंठ त्रिभुवन ,भाजपा अल्पसंख्याक मोर्चा शहर अध्यक्ष जलील अन्सारी ,भाजपा भटके विमुक्त आघाडी जिल्हा सरचिटणीस अकबर शहा ,भाजप उपाध्यक्ष बुधन बाबा शेख,भाजपा दिव्यांग आघाडी शहर अध्यक्ष दिपक पगारे,भाजपा अनुसूचित मोर्चा अध्यक्ष आशीष चावरिया, भाजपा वकील आघाडी अध्यक्ष ऍड राजेंद्र पालवे,भाजप सहकार आघाडी अध्यक्ष किरण उगलमूगले, भाजपा नाशिक जिल्हा ओबीसी आघाडी चिटणीस गौरव ढोले,धीरज भाबड,अक्षता दिपक पगारे ,तौसिफ तांबोळी, मुद्दशीर शेख,ज्ञानेश्वर केकाण आदी भाजपा पदाधिकाऱ्यांन सह भाजपा चे बूथ प्रमुख शक्ति केंद्र प्रमुख व कार्यकर्ते हितचिंतक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते या जल्लोष कार्यक्रम चे संयोजन भाजपा शहर अध्यक्ष जयकुमार फुलवाणी ,जलील अन्सारी, नितीन परदेशी यांनी केले.


अजून बातम्या वाचा..

मनमाड पाठोपाठ नांदगाव भाजपा मध्ये नाराजीनाट्य, सानप, छाजेड यांच्यावर कारवाईची मागणी

मनमाड पाठोपाठ नांदगाव भाजपा मध्ये नाराजीनाट्य, सानप, छाजेड यांच्यावर कारवाईची मागणी

नुकत्याच पार पडलेल्या नगरपालिका व नगरपंचायत निवडणुकीत महाराष्ट्रात नंबर एक राहिलेल्या भारतीय जनता...

read more
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या गटनेतेपदी नाईक तर विरोधी पक्षनेतेपदी नरवडे

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या गटनेतेपदी नाईक तर विरोधी पक्षनेतेपदी नरवडे

नाशिक येथे झालेल्या बैठकीत मनमाड नगर परिषदेच्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या गटनेतेपदी...

read more
फुले शाहू आंबेडकर मुस्लिम विचार मंच व मुस्लिम लायब्ररी यांच्यातर्फे फातिमाबी शेख यांची जयंती साजरी

फुले शाहू आंबेडकर मुस्लिम विचार मंच व मुस्लिम लायब्ररी यांच्यातर्फे फातिमाबी शेख यांची जयंती साजरी

म.ज्योतिबा फुले व क्रांतिज्योती सावित्रीमाई फुले यांच्या स्त्री शिक्षणाच्या कार्यात स्वतःला वाहून...

read more
.