मनमाड शहरात नांदगाव रोड वरील माऊली नगर मध्ये झालेल्या धाडसी घरफोडीत सोन्याच्या वस्तूंसह चार चाकी वाहनाची चोरी झाल्याने खळबळ माजली आहे. याबाबत फिर्यादी नदीम हारून शेख, वय २८ राहणार माऊली नगर यांनी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. दिनांक १९ जुलै रोजी ही घटना घडली असून चोरटयांनी शेख यांच्या राहत्या घराच्या टेरेस चा दरवाजा तोडत घरात प्रवेश केला. टेबलच्या कप्प्यात असलेले रोख ७ हजार तसेच कपाटातील तीन ग्रॅम वजनाच्या कानातील सोन्याच्या रींगा, सोन्याचे मणी असा १४५०० चोरून नेला. होंडा कंपनी ची अमेझ फोर व्हिलर गाडी क्रमांक एम.एच.४१ ए झेड ०४७७ किंमत रुपये ५ लाख ५० हजार ही गाडी चोरटयांनी चोरून नेली असल्याची फिर्याद शेख यांनी दाखल केली असून पुढील तपास सहाय्यक निरीक्षक प्रल्हाद गीते यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक जी.एस.जांभळे करीत आहे.
SNJB ला महिंद्रा अँड महिंद्रा तर्फे बोलेरो न्युओ ऍम्बुलन्स भेट
श्री नेमिनाथ जैन ब्रम्हचर्याश्रम (जैन गुरुकुल) SNJB चांदवड या संस्थेच्या आयुर्वेद ऍन्ड...











