Breaking News

[post-marguee]

[ays_poll id=7]

केंद्रीय विद्यालय मनमाड : दहावीत हर्षदा लाड प्रथम

Jul 25, 2022

दिनांक २२ जुलै रोजी इयत्ता दहावीचा सीबीएससी चा निकाल जाहीर झाला. या परीक्षेत मनमाडच्या केंद्रीय विद्यालय मध्य रेल्वे विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले. ६५ विद्यार्थी या परीक्षेला बसले होते. त्यापैकी ६३ विद्यार्थी उत्तम गुण संपादन करून यशस्वी झाले. हर्षदा लाड ९३.४ टक्के गुण मिळवून विद्यालयात प्रथम, वंश कातकडे ९१. ६ टक्के गुण द्वितीय आला. तसेच मोक्षिता भंडारी व श्रेयस घाडगे ९१.२ टक्के तृतीय क्रमांक व आदिती देव ८९.६ टक्के मिळवत चतुर्थ क्रमांक मिळविला. मोहित लुनावत याने ८५.४ टक्के गुण मिळवून पाचवा क्रमांक मिळवला.
यशस्वी विद्यार्थ्यांचे रेल्वे कारखान्याचे मुख्य प्रबंधक व केंद्रीय विद्यालयाचे चेअरमन मयंक सिंग, प्राचार्य सुनील परदेशी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले. विद्यार्थ्यांना प्राचार्य सुनील परदेशी, विनोद माळी, अनिल झिंजवाडिया, मनोज मलासी, दिनेश जांगिड , सोनाली गुंडगळ इत्यादी शिक्षकांनी मार्गदर्शन केले.

अजून बातम्या वाचा..

कोरोना काळात आई वडिलांचे छत्र हरपलेल्या विद्यार्थ्यांना भारतीय जैन संघटना घेणार दत्तक !

कोरोना काळात आई वडिलांचे छत्र हरपलेल्या विद्यार्थ्यांना भारतीय जैन संघटना घेणार दत्तक !

COVID 19 मध्ये कोरोनामुळे आई किंवा वडिलांचे तसेच दोघांचेही छत्र हरवलेल्या मुलामुलींना मोफत शिक्षण...

read more
मनमाड शहरातील अग्रगण्य असलेली प्रगती अर्बन को – ऑप बँकेच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर

मनमाड शहरातील अग्रगण्य असलेली प्रगती अर्बन को – ऑप बँकेच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर

मनमाड शहरातील अग्रगण्य असलेली प्रगती अर्बन को - ऑप बँकेच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला...

read more
युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त मनमाड गुरुद्वरामध्ये युवती सेनेतर्फे चादर अर्पण तसेच खिचडी वाटप

युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त मनमाड गुरुद्वरामध्ये युवती सेनेतर्फे चादर अर्पण तसेच खिचडी वाटप

युवासेना प्रमुख तथा राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून ,...

read more
[hsas-shortcode group="" speed="10" direction="left" gap="50"]