मनमाड शहरातील हनुमान नगर भागातील एका बंद घराचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्यानी २० ग्रॅम सोन्याचे दागिने चोरल्याची घटना घडली.या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून गेल्या काही दिवसापासून शहर परिसरात घरफोडीच्या घटनांमध्ये वाढ झाल्याने चिंता व्यक्त केली जात आहे.
याप्रकरणी मनमाड पोलीस स्थानकात प्रवीण विश्वासराव आहेर वय ४१, रा. हनुमान नगर मनमाड यांनी फिर्यादी दिली आहे. अज्ञात चोरट्यांनी घराचे कुलूप तोडून घरात प्रवेश केला.घरातील कपाटात असलेले १ ) ८ हजार रुपये किमंतीचे ४ ग्रॅम वजनाचे सोन्याचे मणी मंगळसूत्र २ ) ४ हजार रुपये किंमतीचे २ ग्रॅम वजनाचे सोन्याचे कानातील झुमके ३ ) ८ हजार रुपये किंमतीचे ४ ग्रॅम वजनाचे सोन्याचे कानातील टॉप ४ ) २० हजार रुपये किंमतीचे १ तोळा वजनाची सोन्याची अंगठी असा एकूण ४० हजार किंमतीचा ऐवज अज्ञात चोरट्यांनी लंपास केले असे दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे पुढील तपास प्रभारी पोलीस निरीक्षक प्रल्हाद गीते यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कर्मचारी करीत आहे.
SNJB ला महिंद्रा अँड महिंद्रा तर्फे बोलेरो न्युओ ऍम्बुलन्स भेट
श्री नेमिनाथ जैन ब्रम्हचर्याश्रम (जैन गुरुकुल) SNJB चांदवड या संस्थेच्या आयुर्वेद ऍन्ड...











