loader image
[ays_poll id=7]

जिल्हा परिषद / पंचायत समिती निवडणूक :आरक्षण सोडतीने उडविली मातब्बरांची झोप

Jul 28, 2022


नांदगाव (सोमनाथ घोंगाणे): नांदगाव तालुक्यातील चार जिल्हा परिषद गट अनुसुचित जाती स्त्री या प्रवर्गा साठी राखीव झाल्याने सर्व पक्षीय ज्येष्ठ व तरूण नेत्यामध्ये नाराजी आहे. राज्य निवडणूक आयुक्त यांच्या आदेशान्वये आज जिल्हा परिषद नाशिक येथे चिठ्ठीद्वारे काढण्यात आली .यात नांदगाव तालुक्यातील चारही गट अनुक्रमे न्यायडोंगरी, जातेगाव,साकोरा,भालूर हे अनुसुचीत जमाती स्त्री या प्रवर्गासाठी राखीव निघाले तसेच विधानसभा मतदार संघातील मालेगाव तालूक्यातील तीन गट टाकळी, निमगाव, कळवाडी हे सुद्वा अनुसुचीत जमाती साठी राखीव निघाल्याने सर्व पक्षीय नेते अस्वस्थ झाले असून त्याच्या स्वप्नांवर पाणी फिरले .तसेच जिल्हा परिषद अंर्तगत येणाऱ्या नांदगाव पंचायत समितीची गणासाठी आरक्षण सोडत आज तहसिल कार्यालयात रोहयो उपजिल्हाधिकारी नितीन मुंडावरे, तहसिलदार डॉ. सिद्घार्थकुमार मोरे योंच्या उपस्थितीत काढण्यात आली . यात लहान मुलांनी चिठ्ठीद्वारे काढलेले आरक्षण पुढीलप्रेमाणे

१) वेहळगाव अनुसुचीत जाती
२) साकोरा सर्वसाधारण स्त्री
३) सावरगाव सर्वसाधारण
४) न्यायडोंगरी सर्वसाधारण स्त्री
५) पानेवाडी अनुसुचीत जमाती स्त्री
६) भालूर सर्व साधारण स्त्री
७) मांडवड अनुसुचीत जमाती
८) जातेगाव नागरिकांचा मागासवर्ग

यावेळी निवडणुक निवासी नायब तहसिलदार चेतन कोनकर, अव्वल कारकून संतोष डुबंरे, महसुल सहाय्यक नाना बागडे,परेश रायजादे यांनी यावेळी चोख कामगिरी बजावली.
तालुक्यातील जिल्हा परिषदेचे चारही गट अनुसुचीत महीला या प्रवर्गासाठी राखीव झाल्याने या गटातील इच्छूक जेष्ट नेते मंडळी आता पंचायत समिती साठी आपले नशीब आजमावतील त्यामुळे स्थानीय छोटया पुढारी मंडळी मध्ये अस्वस्थता पाहण्यास मिळत आहे.
.


अजून बातम्या वाचा..

रोटरी क्लब ऑफ मनमाड मॅजिक तर्फे मोफत नेत्र तपासणी आणि मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबीर अनकाई येथे संपन्न

रोटरी क्लब ऑफ मनमाड मॅजिक तर्फे मोफत नेत्र तपासणी आणि मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबीर अनकाई येथे संपन्न

  दिनांक 17 मंगळवार रोजी अनकाई येथे रोटरी क्लब ऑफ मनमाड मॅजिक आणि रोटरी आय हॉस्पिटल मालेगाव...

read more
महात्मा गांधी विद्या मंदिर संस्थेच्या कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय, मनमाड, ता. नांदगाव,जि. नाशिक महाविद्यालयास ‘स्वायत्त दर्जा’ प्रदान

महात्मा गांधी विद्या मंदिर संस्थेच्या कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय, मनमाड, ता. नांदगाव,जि. नाशिक महाविद्यालयास ‘स्वायत्त दर्जा’ प्रदान

  मनमाड :- महात्मा गांधी विद्या मंदिर संस्थेच्या कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय, मनमाड,...

read more
व्यापारी महासंघाचे अध्यक्ष राजाभाऊ पारीक, अनिल पारीक आणि द्वारकेश पारीक ह्यांच्यावर झालेल्या प्राणघातक हल्ल्याच्या निषेधार्थ बुधवारी मनमाड बंद

व्यापारी महासंघाचे अध्यक्ष राजाभाऊ पारीक, अनिल पारीक आणि द्वारकेश पारीक ह्यांच्यावर झालेल्या प्राणघातक हल्ल्याच्या निषेधार्थ बुधवारी मनमाड बंद

मनमाड -- मनमाड शहर व्यापारी महासंघ चे अध्यक्ष राजाभाऊ पारीक तसेच त्यांचे लहान बंधू अनिल पारीक व...

read more
.