नांदगाव : नांदगाव शहर व परिसरात आज ४ वाजेपासून जोरदार पाऊस चालू आहे.
आज सकाळ पासून हवामान दमट होते. दुपारी चार वाजे पासून जोरदार पाऊसाला सुरवात झाली . माक्रेट यार्ड मध्ये आलेल्या शेतकऱ्यांचे प्रंचड हाल झाले असून सुमारे २५० ते ३०० पीकअप ट्रॅक्टर मधून शेतकरी कांदे घेवून आले होते . शेतकरी बांधवाचे खुपच हाल झाले . त्यातच कांदयाला दर नाही . उत्पादन खर्च सुद्वा सुटत नाही. शेतकऱ्यांनी ४ महीने झाले कांदे चाळीत साठवून ठेवले आहे.
नगर परिषद कर्मचाऱ्यांच्या विविध देय रकमा अदा कराव्यात : म्युनिसिपल कामगार सेनेची निवेदनाद्वारे मागणी
मनमाड नगर परिषद म्युनिसिपल कामगार सेनेच्या वतीने कर्मचाऱ्यांच्या विविध देय मागण्यांबाबत चे निवेदन...











