Breaking News

[post-marguee]

[ays_poll id=7]

रोटरी क्लब मनमाड आणि म.रे.मा. विद्यालयातर्फे क्रांतिदौड-मिनी मॅरेथॉनचे आयोजन

Aug 12, 2022

मनमाड (योगेश म्हस्के) : रोटरी क्लब मनमाड गेल्या २० वर्षापासुन ९ ऑगस्ट या क्रांतीदिनी क्रांतिदौड-मिनी मैरथॉन चे आयोजन शालेय विद्यार्थांसाठी करित असते. ह्या वर्षी म.रे.मा. विद्यालयाच्या शतक महोत्सवी वर्षानिमित्ताने उत्स्फूर्त अश्या प्रतिसादात ही स्पर्धा पार पाडली. एकुण ६ शाळेंमधुन १२० स्पर्धकांनी सहभाग नोंदविला. बाक्षिस वितरण प्रसंगी देशभक्तिपर गितावर नृत्य म.रे.मा विद्यालयाने सादर केले.

‘कबड्डी खेळाची पंढरी’ अशी पुर्वी ओळख असलेल्या या शहराचे नाव अलिकडे सातासमुद्रापालिकड़े पोहोचले आहे.येथिल युवकांनी वेटलिफ़्टिंग, जिम्नैस्टिक या प्रकारात जागतिक पातळीवर दैदिप्यमान कामगिरी करत यश संपादन केले आहे. रोटरी क्लब मनमाड वा म.रे.मा विद्यालय, मनमाड यांच्या संयुक्त विद्यमाने विद्यार्थांमधिल ह्या क्रिडागुणांना वाव मिळण्याकरीता क्रांतीदौड ही उपयुक्त ठरणार आहे.ह्याप्रसंगी रोटरी क्लब चे अध्यक्ष इंजी. स्वप्निल सूर्यवंशी, सेक्रेटरी डॉ. सुमित शर्मा, रोटे.सुभाष गुजराती सर, रोटे. गुरजीत कांत ,रोटे.अनिल दादा काकड़े, रोटे.पोपटसेठ बेदमुथा, रोटे.आनंद काकडे, रोटे.देवराम सदगिर, रोटे.आनंद लोढा, रोटे.भूषण शर्मा, रोटरी महिला क्लब तसेच

म.रे.मा. विद्यालयाचे मुख्याध्यापिका क्रांती कुंदरकर मॅडम, उपमुख्याध्यापक श्री.कोळी सर, श्री.गद्रे सर ,क्रिडाशिक्षक गायधने सर, शिक्षकवृंद उपस्थित होते.

अजून बातम्या वाचा..

आर्थिकदृष्ट्या गरीब नागरिकांना अंत्यविधीसाठी मोफत लाकडे उपलब्ध करावी – रिपाइं

आर्थिकदृष्ट्या गरीब नागरिकांना अंत्यविधीसाठी मोफत लाकडे उपलब्ध करावी – रिपाइं

मनमाड शहरात मोठ्याप्रमाणावर रोजंदारीवर काम करणारे नागरिक असून परिवारातील एखाद्या सदस्यांचे निधन...

read more
विद्यार्थ्याने शाळा सोडल्यानंतर दाखला आणि जनरल रजिस्टर दुरुस्ती अधिकार शिक्षणाधिकाऱ्यांना – मा. मुंबई उच्च न्यायालयाचा दिलासादायक निकाल

विद्यार्थ्याने शाळा सोडल्यानंतर दाखला आणि जनरल रजिस्टर दुरुस्ती अधिकार शिक्षणाधिकाऱ्यांना – मा. मुंबई उच्च न्यायालयाचा दिलासादायक निकाल

शाळा सोडल्यानंतर किंवा शिक्षण पूर्ण झाल्यावर शाळेच्या दाखल्यावर जन्मतारीख, स्वतःचे नाव, वडिलांचे...

read more
मोरया गणेश मित्र मंडळातर्फे अनिष्ट रूढी-परंपरांना छेद – विधवा माता-भगिनींना आरतीचा मान…

मोरया गणेश मित्र मंडळातर्फे अनिष्ट रूढी-परंपरांना छेद – विधवा माता-भगिनींना आरतीचा मान…

लोकमान्य टिळकांनी गणेशोत्सवाची सुरुवात ही समाज प्रबोधन आणि जनसामान्यांच्या एकात्रीकरणासाठी केली...

read more
[hsas-shortcode group="" speed="10" direction="left" gap="50"]