loader image
[ays_poll id=7]

मनोरम सदन शाळेत स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव उत्साहात साजरा

Aug 18, 2022


मनमाड येथील मनोरम शाळेत स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव उत्साहात साजरा करण्यात आला.या प्रसंगी राष्ट्रीय ध्वजाचे ध्वजारोहण मा.श्री.महिपत हरकल सर यांच्या हस्ते करण्यात आले, सौ.बेन्सन यांनी देशाप्रती प्रार्थना केली व विद्यार्थ्यांनी विविध वेशभूषा, भाषणे, समूहगीत आणि नृत्य त्याचप्रमाणे अमृत महोत्सव सप्ताहात विविध स्पर्धा राबविण्यात आल्या, निबंध स्पर्धा, हस्ताक्षर स्पर्धा, रांगोळी स्पर्धा, वेशभूषा, गायन स्पर्धा, नृत्य स्पर्धा, विद्यार्थ्यांची रॅली काढण्यात आली, विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांना वाव मिळावा या उद्देशाने सदरील स्पर्धांचे आयोजन करण्यात आले शाळेच्या मुख्याध्यापिका सौ.वाघमारे मॅडम यांनी देशाला स्वातंत्र्य मिळून देण्यासाठी योगदान, जीवाची पर्वा न करता इंग्रजी हुकूमत विरोधात केलेले आंदोलन यामुळे भारताला स्वातंत्र्य मिळाले असे विचार विषद केले. अनुमोदन सौ.वाघ मॅडम यांनी दिले, राष्ट्रीय भक्तीपर गीत आणि समूहगीत गायन सौ.एस.एस.पाटील मॅडम यांनी पेटीवादन संगीताची साथ दिली, तसेच सौ.जयश्री खंडागळे मॅडम यांनी सूत्रसंचालन केले, श्री विल्सन घोडेराव यांनी सहकार्य केले, बोधामृत मा श्री हरकल सर यांनी विद्यार्थ्यांचे शिक्षकांचे आणि पालकांचे भरभरून कौतुक केले,कार्यक्रमास सौ.वाघमारे, गोसावी,पाटील, भावसार, देवरे, ठाकूर, आहेर, वाघ, खंडागळे, शिंदे, सौ.रुपाली पगारे, शकू पगारे,बेन्सन, कांबळे,शेल्टे, देठे, साने,विल्सन घोडेराव, प्रसाद बधान व शाळेतील विद्यार्थी व पालक वर्ग मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.


अजून बातम्या वाचा..

मनमाड पाठोपाठ नांदगाव भाजपा मध्ये नाराजीनाट्य, सानप, छाजेड यांच्यावर कारवाईची मागणी

मनमाड पाठोपाठ नांदगाव भाजपा मध्ये नाराजीनाट्य, सानप, छाजेड यांच्यावर कारवाईची मागणी

नुकत्याच पार पडलेल्या नगरपालिका व नगरपंचायत निवडणुकीत महाराष्ट्रात नंबर एक राहिलेल्या भारतीय जनता...

read more
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या गटनेतेपदी नाईक तर विरोधी पक्षनेतेपदी नरवडे

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या गटनेतेपदी नाईक तर विरोधी पक्षनेतेपदी नरवडे

नाशिक येथे झालेल्या बैठकीत मनमाड नगर परिषदेच्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या गटनेतेपदी...

read more
फुले शाहू आंबेडकर मुस्लिम विचार मंच व मुस्लिम लायब्ररी यांच्यातर्फे फातिमाबी शेख यांची जयंती साजरी

फुले शाहू आंबेडकर मुस्लिम विचार मंच व मुस्लिम लायब्ररी यांच्यातर्फे फातिमाबी शेख यांची जयंती साजरी

म.ज्योतिबा फुले व क्रांतिज्योती सावित्रीमाई फुले यांच्या स्त्री शिक्षणाच्या कार्यात स्वतःला वाहून...

read more
.