नांदगाव: नगरपालिकेने उभारलेल्या नवीन व्यापारी संकुलातील गाळ्यांचे ई लिलाव रद्द करण्यात यावे आणि मूळ गाळे धारकांना प्राधान्याने देण्यात यावे या मागणीसाठी नगरपालिके समोर गाळेधारकांचे साखळी उपोषण .
याबाबत वृत असे की सुमारे १५ वर्षापुर्वी नगरपालिकेने जुने भाजीमाक्रेट तोडून नवीन शॉपीग सेंटर चे काम सुरू केले . या १५ वर्षापुर्वी विस्थापीत झालेल्या जुन्या गाळेधारकांचे प्रकरण न्यायप्रविष्ट असतानां नगरपालिकेने ई लिलाव करणेसाठी जाहीरात दिली आहे . सदर इ लिलाव थांबविण्याची मागणी मे .तहसीलदार साहेब तसेच मुख्याधिकारी यांना दिलेल्या निवेदनाद्वारे यापुर्वीच केली आहे. तरीही न. पा. इ. लिलाव करण्याच्या तयारीत असल्याने ४२ जुने गाळेधारक न. पा. समोर साखळी उपोषणास बसले आहे .
नांदगाव शहरातील महात्मा फुले चौक येथे नांदगाव नगरपालिकेच्या वतीने व्यापारी संकुल उभारण्यात आले आहे. या संकुलातील गाळ्यांचे ई लिलाव करण्यात संदर्भात वृत्तपत्रात नोटीस प्रसिद्ध करण्यात आली होती यास जुन्या गाळेधारकांनी आक्षेप घेत प्रशासनाला निवेदन देण्यात आले परंतु याची कोणतीही दखल घेतली न गेल्याने गाळेधारकांनी साखळी उपोषणाचे हत्यार उपसले असून त्यांना विविध राजकीय पक्ष, संघटनांनी पाठिंबा दिला आहे.
आज उपोषणास बसलेले गाळेधारक पुढील प्रेमाणे बाबूलाल कायस्थ ‘सरफराज खान ‘संदीप सिसोदिया ‘धनराज सोनवणे ‘कुदरत अली शहा ‘ नारायण निकम’ प्रकाश चव्हाण । रामदास निकम ‘ अब्दुल खालिक ‘
शेख शबिक मोहम्मद ‘राजू निकम ‘ सूर्यभान राजुळे ‘ कैलास शिंदे, कैलास कंदीकलर ‘ गवळी आप्पा ‘ सकाराम सोनवणे ‘रमेश दुबे ‘ भावसाहेब सोनवणे ‘ वनिता सोनवणे आदी गाळेधारक उपोषणास बसले आहेत.
मनमाड साहित्य संघाच्या काव्य स्पर्धा उत्साहात संपन्न
मनमाड साहित्य संघा ने आयोजित केलेल्या शालेय विद्यार्थ्यांसाठींची काव्यस्पर्धा मराठी भाषा गौरव दिनी...











