loader image
[ays_poll id=7]

भुसावळ विभागातील तब्बल ३६ रेल्वे गाड्या रेल्वे प्रशासनाने केल्या रद्द : प्रवाशांत नाराजी

Aug 20, 2022


मनमाड :छत्तीसगडमधील दक्षिण पूर्व मध्य रेल्वे झोनमधील बिलासपूर विभागातील इंगुर स्थानक ते रायगड झारसीगुडा विभागामध्ये रेल्वेच्या चौथ्या लाईनचे काम सुरू होत असल्याने भुसावळ विभागातून त्या भागात धावणाऱ्या तब्बल ३६ प्रवासी रेल्वे गाड्या रेल्वे प्रशासनाकडून ऐनवेळी रद्द करण्यात आल्याने प्रवाशांमध्ये तीव्र संतापाची लाट पसरली आहे . ऐन उत्सवाच्या काळात गाड्या रद्द झाल्याने प्रवाशांना पर्यायी खाजगी वाहनांचा आधार घ्यावा लागणार आहे अथवा अन्य गाड्यांचे आरक्षण करावे लागणार असल्याने रेल्वेच्या कार्यपद्धत्तीविषयी नाराजी व्यक्त होत आहे.
भारतीय रेल्वेत मोठ्या प्रमाणावर रेल्वे प्रशासनाकडून विविध कामे सुरू असून काही सुरू होण्याच्या मार्गावर आहे. यामुळे पूर्व नियोजित रेल्वे गाड्यांचे आरक्षण असल्यावर त्यांचे ते रद्द होत आहे.यामुळे प्रवासी वर्गातून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे . प्रवाशांनी तीन ते चार महिने अगोदरच रेल्वे गाड्यांचे आरक्षण केले असल्याने व ते अचानक रेल्वे गाड्या रद्द होत असल्याने प्रवासी संतप्त झाले आहेत . दक्षिण पूर्व मध्य रेल्वेझोनमधील बिलासपूर विभागात चौथ्या लाईनीचे काम सुरू असल्याने २० ते ३० ऑगस्ट दरम्यान भुसावळ विभागातून पुणे , मुंबई , अमदाबादकडे जाणाऱ्या ३६ रेल्वे गाड्या रद्द झाल्या आहे.

रद्द करण्यात आलेल्या प्रवासी रेल्वे गाड्या : संत्रागाची – पुणे ( दि. २० ऑगस्ट व २७ ऑगस्ट ) , पुणे – संत्रागाची ( दि. २२ व २९ ऑगस्ट ) , शालीमार पोरबंदर ( दि. २६ व २७ ऑगस्ट ) , पोरबंदर – शालीमार ( दि. २४ व २५ ऑगस्ट ) , पुरी – जोधपूर ( दि. २४ ऑगस्ट ) , जोधपूर पुरी ( दि. २७ ऑगस्ट ) , शालीमार – ओखा ( दि. २३ व ३० ऑगस्ट ) , ओखा – शालीमार ( दि. २१ व २८ ऑगस्ट ) , मालदाटाऊन – सुरत ( दि. २० व २७ ऑगस्ट ) , सूरत – मालदा टाऊन ( दि. २२ ऑगस्ट व २९ ) , हावडा पुणे – हावडा ( दोन्ही बाजूची दि. २१ व २८ ऑगस्ट ) , संत्रागाची – पोरबंदर ( दि. २८ ऑगस्ट) , पोरबंदर संत्रागाची ( दि..२६ ऑगस्ट ) , संत्रागाची एलटीटी ( दि. २६ व २७ ऑगस्ट) , एलटीटी – संत्रागाची ( दि. २४ व २५ ऑगस्ट ) , भुवनेश्वर – एलटीटी ( दि. २२, २५, २९ ऑगस्ट ) , एलटीटी भुवनेश्वर ( दि. २४, २७ व ३१ ऑगस्ट ) , हटीया – एलटीटी ( दि. २६ व २७ ऑगस्ट ) , एलटीटी हटिया ( दि. २८ व २९ ऑगस्ट ) , हावडा शिर्डी साईनगर ( दि. २५ ऑगस्ट ) , साईनगर शिर्डी – हावडा ( दि. २७ ऑगस्ट ) , हावडा – मुंबई ( दि. २६ ) , मुंबई – हावडा ( दि. २८ ऑगस्ट ) , एलटीटी – कामाख्य ( दि. २० व २७ ऑगस्ट ) , कामाख्य – एलटीटी ( दि .२३ व ३० ऑगस्ट ) , हावडा – मुंबई मेल ( दि. २१ ते २८ ऑगस्ट सलग आठ दिवस रद्द ) , मुंबई – हावडा मेल ( दि. २१ ते २८ सलग आठ दिवस ) , अहमदाबाद हावडा , हावडा अहमदाबाद , शालिमार – एलटीटी व एलटीटी शालीमार या गाड्या ( दि.२१ ते २८ ऑगस्ट पर्यंत रद्द आहे . ) , हावडा – पुणे ( दि. २०, २५ व २७ ऑगस्ट ) , पुणे – हावडा ( दि. २२, २७ व २९ ऑगस्ट ) , हावडा – मुंबई ( दि. २२, २३, २४ व २६ ऑगस्ट ) , मुंबई – हावडा ( दि. २३, २४, २५ व २८ ऑगस्ट ) , हटीया – पुणे ( दि. २२ , २६ व २९ ऑगस् , पुणे – हटिया ( दि. २४, २८ व ३१ ऑगस्ट ) आदी गाड्या रद्द झाल्या आहेत .


अजून बातम्या वाचा..

श्री निलमणी गणेश मंदीर सार्वजनिक ट्रस्ट तर्फे गरीब रुग्णांना मोफत सेवेसाठी रु.1,09,000/- किंमतीची औषधे सेवा भारतीकडे सुपूर्द

श्री निलमणी गणेश मंदीर सार्वजनिक ट्रस्ट तर्फे गरीब रुग्णांना मोफत सेवेसाठी रु.1,09,000/- किंमतीची औषधे सेवा भारतीकडे सुपूर्द

मनमाड - मनमाड शहरात धार्मिक, सांस्कृतिक, पर्यावरण, सामाजिक व शैक्षणिक आरोग्य सेवा क्षेत्रात सन...

read more
मनमाड येथे तालुक्यातील पत्रकारांचा गुणगौरव व ज्येष्ठ पत्रकारांचा जीवनगौरव पुरस्कार वितरण सोहळा

मनमाड येथे तालुक्यातील पत्रकारांचा गुणगौरव व ज्येष्ठ पत्रकारांचा जीवनगौरव पुरस्कार वितरण सोहळा

मनमाड : पत्रकार दिनानिमित्त नांदगाव–मनमाड मराठी पत्रकार संघातर्फे गुरुवार, ता. २९ जानेवारी रोजी...

read more
.