loader image
[ays_poll id=7]

संस्कृती संवर्धन समितीच्या वतीने विद्यार्थ्यांचा बक्षिस वितरण समारंभ संपन्न

Aug 20, 2022


मनमाड : गेल्या 27 वर्षांपासून मनमाड शहरामध्ये स्वामी विवेकानंद व्याख्यानमालेसह विविध उपक्रमांचे आयोजन करून शहराचा सांस्कृतिक वारसा जपणाऱ्या संस्कृती संवर्धन समितीच्या वतीने दरवर्षी प्रमाणे यंदाच्या वर्षी देखील शालेय स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते , या शालेय स्पर्धेचा बक्षिस वितरण समारंभ मान्यवरांच्या उपस्थितीत आज संपन्न झाला.शालेय विद्यार्थ्यांच्या सांस्कृतिक विकासाची वाटचाल सुकर व्हावी या हेतुने 5 वी ते 10 विच्या मनमाड मधील सर्व शाळेंच्या विद्यार्थ्यांसाठी वयोगटानुसार विविध विषयांच्या स्पर्धेचे आयोजन दिनांक 27 जुन रोजी करण्यात आले होते.

या सर्व स्पर्धेतील यशस्वी विद्यार्थ्यांना समितीच्या वतीने सन्मानचिन्ह आणि प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.स्पर्धेतील सर्व सहभागी विद्यार्थ्यांना सहभाग प्रमाणपत्र देऊन आणि स्पर्धेमध्ये विद्यार्थ्यांचा संख्यात्मक सहभाग जास्त असणाऱ्या छत्रे हायस्कुल विद्यालयास सन्मानचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले.या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणुन आंतरराष्ट्रीय वेटलिफ्टिंग खेळाडु आकांक्षा व्यवहारे आणि आंतरराष्ट्रीय कुस्ती खेळाडु शुभम आचफळे हे सर्व प्रमुख उपस्थित होते.

यावेळी संस्कृती संवर्धन समितीचे अध्यक्ष श्री प्रमोद मुळे , संस्कृती संवर्धन बहु.संस्थेचे अध्यक्ष श्री प्रवीण व्यवहारे , समितीचे सचिव श्री महेश नावरकर , खजिनदार श्री अमोल तावडे , प्रसिद्धी प्रमुख श्री योगेश म्हस्के , जेष्ठ सदस्य श्री रमाकांत मंत्री , श्री रत्नाकर घोंगडे , श्री प्रसाद दिंडोरकर , श्री डॉ.सुहास जाधव , श्री आनंद काकडे , श्री सिद्धांत लोढा ,श्री सोमनाथ राजनोर , श्री अभिजित रसाळ , श्री गोकुळ परदेशी बक्षिसपात्र विद्यार्थी आणि पालकवर्ग मोठया संख्येने उपस्थित होते.


अजून बातम्या वाचा..

मनमाड पाठोपाठ नांदगाव भाजपा मध्ये नाराजीनाट्य, सानप, छाजेड यांच्यावर कारवाईची मागणी

मनमाड पाठोपाठ नांदगाव भाजपा मध्ये नाराजीनाट्य, सानप, छाजेड यांच्यावर कारवाईची मागणी

नुकत्याच पार पडलेल्या नगरपालिका व नगरपंचायत निवडणुकीत महाराष्ट्रात नंबर एक राहिलेल्या भारतीय जनता...

read more
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या गटनेतेपदी नाईक तर विरोधी पक्षनेतेपदी नरवडे

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या गटनेतेपदी नाईक तर विरोधी पक्षनेतेपदी नरवडे

नाशिक येथे झालेल्या बैठकीत मनमाड नगर परिषदेच्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या गटनेतेपदी...

read more
फुले शाहू आंबेडकर मुस्लिम विचार मंच व मुस्लिम लायब्ररी यांच्यातर्फे फातिमाबी शेख यांची जयंती साजरी

फुले शाहू आंबेडकर मुस्लिम विचार मंच व मुस्लिम लायब्ररी यांच्यातर्फे फातिमाबी शेख यांची जयंती साजरी

म.ज्योतिबा फुले व क्रांतिज्योती सावित्रीमाई फुले यांच्या स्त्री शिक्षणाच्या कार्यात स्वतःला वाहून...

read more
.