loader image
[ays_poll id=7]

विठ्ठल रखुमाई मंदीरास आ.सुहास अण्णा कांदे यांच्याकडून मखरासाठी सव्वा किलो चांदी भेट

Aug 21, 2022


नांदगाव (सोमनाथ घोंगाणे) :नांदगाव शहरातील श्री संत सावता महाराज कंपाऊड येथील विठ्ठल रखुमाई मंदीरास आ.सुहास अण्णा कांदे यांच्याकडून मखरासाठी सव्वा किलो चांदी भेट

शहरातील श्री संत सावता कंपाउंड नांदगाव येथील असलेल्या विठ्ठल रखुमार्ई मंदिरातील मखरासाठी आ. कांदे यांनी मनोभावे सव्वा किलो चांदीची भेट उत्सव समिती पदाधिकारी व सदस्यांकडे सुपूर्द केली.
श्री संत शिरोमणी सावता महाराज उत्सव समिती तर्फे निरंतर सप्ताहाचे आयोजन केले जाते यावर्षी सप्ताह समाप्तीच्या दिवशी आ. सुहास कांदे यांना आरतीचा मान दिला गेला होता याप्रसंगी महिलांमधून विठ्ठल रखुमाई मंदिराच्या मखरीसाठी चांदी दान देण्याची चर्चा त्यांनी ऐकली व याबाबत विचारणा केली असता सव्वा किलो चांदी देण्याची मनोगत व्यक्त केले होते या नुसार आज उत्सव समितीच्या सर्व पदाधिकारी व सदस्यांना निवासस्थानी आमंत्रित करून सव्वा किलो चांदी चे दान देण्यात आले.
आ. कांदे यांची निरंतर धार्मिक कार्यक्रमातील रुची सर्वश्रुत आहे.याचेच हे एक उत्तम उदाहरण.
श्री संत सावता महाराज उत्सव समिती सदस्यांनी या वेळी आमदारांचे आभार व्यक्त केले.
या वेळी विष्णू निकम सर, राजाभाऊ मोरे, पैठणकर तात्या, बाळासाहेब मोकळ, देवमन टिळेकर, दत्तू मोरे, गोपाळ भस्मे, राहुल खैरनार, सोमासे सर, कैलास गायकवाड, प्रशांत खैरनार, भगीरथ जेजूरकर, कारभारी शिंदे, रामभाऊ सोर, सतीश गायकवाड, तसेच
संत शिरोमणी श्री सावता महाराज उत्सव समिती सदस्य उपस्थित होते.


अजून बातम्या वाचा..

श्री निलमणी गणेश मंदीर सार्वजनिक ट्रस्ट तर्फे गरीब रुग्णांना मोफत सेवेसाठी रु.1,09,000/- किंमतीची औषधे सेवा भारतीकडे सुपूर्द

श्री निलमणी गणेश मंदीर सार्वजनिक ट्रस्ट तर्फे गरीब रुग्णांना मोफत सेवेसाठी रु.1,09,000/- किंमतीची औषधे सेवा भारतीकडे सुपूर्द

मनमाड - मनमाड शहरात धार्मिक, सांस्कृतिक, पर्यावरण, सामाजिक व शैक्षणिक आरोग्य सेवा क्षेत्रात सन...

read more
मनमाड येथे तालुक्यातील पत्रकारांचा गुणगौरव व ज्येष्ठ पत्रकारांचा जीवनगौरव पुरस्कार वितरण सोहळा

मनमाड येथे तालुक्यातील पत्रकारांचा गुणगौरव व ज्येष्ठ पत्रकारांचा जीवनगौरव पुरस्कार वितरण सोहळा

मनमाड : पत्रकार दिनानिमित्त नांदगाव–मनमाड मराठी पत्रकार संघातर्फे गुरुवार, ता. २९ जानेवारी रोजी...

read more
.