loader image
[ays_poll id=7]

स्व.विनायकजी मेटे साहेब श्रद्धांजली देण्यासाठी सार्वजनिक शोक सभेचे आयोजन

Aug 22, 2022


अखिल भारतीय मराठा महासंघाचे माजी सरचिटणीस, विधानपरिषद सदस्य, तसेच शिवसंग्राम संघटनेचे संस्थापक,अध्यक्ष स्वर्गीय विनायकजी मेटे साहेब यांचे संशयास्पद रस्ते अपघातात दुर्दैवी निधन झाले.
मराठा आरक्षणाचा बुलंद हरपल्याने समाजात अस्वस्थता निर्माण झाल्याची भावना आहे,या जाणीवेतून त्यांना श्रद्धांजली देण्यासाठी सार्वजनिक शोक सभेचे आयोजन करण्यात आले होते.

या शोकसभेत मराठा आरक्षण तात्काळ लागू करण्यात यावे, अरबी समुद्रातील शिवस्मारकाचे काम पूर्णत्वास न्यावे, स्वर्गीय विनायक जी मेटे यांच्या धर्मपत्नी श्रीमती ज्योतीताई विनायकजी मेटे यांना राज्यपाल नियुक्त विधानपरिषद सदस्य देण्यात यावे अशा मागण्या अखिल भारतीय मराठा महासंघ व सकल मराठा समाज,नांदगाव तालुका यांच्या तर्फे करण्यात आल्या.

या शोकसभेत माजी आमदार राजेंद्र देशमुख,माजी नगराध्यक्ष दिलीपभाऊ सोळशे, भाजपाचे पंकजभाऊ खताळ, जय फुलवानी, नारायण पवार,संदीप नरवडे,आम आदमीचे पार्टीचे जिल्हाध्यक्ष विशाल वडघुले,लक्की कदम,डॉक्टरवाडीचे सरपंच अमोल पाटील, काँग्रेसचे नगरसेवक नाझीम भाई शेख, नगरसेवक रवींद्र घोडेस्वार, शिवसेनेचे नगरसेवक सुनील हांडगे, नगरसेवक प्रमोद पाचोरकर, संतोषभाऊ जगताप,Dr सुहास जाधव, मनसेचे शहराध्यक्ष सचिन शिरुड, वंचित बहुजन विकास आघाडीच्या आम्रपाली ताई निकम,संतोष भोसले, मनमाड बचाव जनआंदोलनाचे कादिर शेख, ज्येष्ठ नागरिक संघाचे नरेंद्र कांबळे बाबूजी, दिलीप आव्हाड, मनमाड बचाव कृती समितीचे जनार्दन देवरे सर, रतन निकम सर, कांतीलाल येणारे , Adv काखंडकी सर, राष्ट्रवादी काँग्रेसचे राजाभाऊ जाधव,आनंद बोथरा, अक्षय देशमुख, शिवसेनेचे शहर प्रमुख मयूरभाऊ बोरसे,आर पी आय चे पद्माकर निळे साहेब इत्यादी मान्यवरांनी स्वर्गीय विनायक जी मेटे साहेब यांच्या,,,,,, सामाजिक, कार्याचा आढावा घेत त्यांच्या आठवणींना उजाळा देत आपल्या शब्द सुमनांनी श्रद्धांजली अर्पण केली

या शोकसभेत पुढील मान्यवर हजर होते पत्रकार किरण काळे, क्रिष्णाजी पगारे,गोपीनाथ गायकवाड,स्वराज देशमुख,संजय कटारे, ललित रसाळ,सचिन शिंदे, समाधान जाधव, निलेश ताठे, संतोष काकळीज,परेश राऊत,सुनील म्हस्के ललित रसाळ, अतुल घुमरे, मुकुंद झाल्टे, अनिल दराडे, एकनाथ बोडके, कचरू आव्हाड,शैलेश भालेराव, दीपक जगताप,रियाज शेख, किरण काळे, विकी कदम, स्वराज करकाळे, सचिन दरगुडे इत्यादी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भिमराज लोखंडे व भास्कर झाल्टे यांनी केले,शोकसभेचे आयोजन विष्णु चव्हाण, विनोद डमरे,नानासाहेब घुमरे,रविंद्र नाढे,वैभव जाधव,गणेश काकळीज,सुनिल म्हस्के यांनी केले.


अजून बातम्या वाचा..

अभिनव बाल विकास मंदिर शाळेचा ‘चित्रकला’ परीक्षेत शंभर टक्के निकालाची परंपरा कायम!

अभिनव बाल विकास मंदिर शाळेचा ‘चित्रकला’ परीक्षेत शंभर टक्के निकालाची परंपरा कायम!

शासकीय कला संचालनालय, महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने सप्टेंबर २०२५ मध्ये घेण्यात आलेल्या एलिमेंटरी...

read more
नांदगाव–मनमाडच्या राजकारणात हालचाल; मंत्री गिरीश महाजन यांची विविध पक्षांच्या नेत्यांची गुप्त भेट

नांदगाव–मनमाडच्या राजकारणात हालचाल; मंत्री गिरीश महाजन यांची विविध पक्षांच्या नेत्यांची गुप्त भेट

नांदगांव : सुमितकुमार जगधने नांदगाव व मनमाड परिसरातील राजकीय वर्तुळात खळबळ उडवणारी महत्त्वाची भेट...

read more
.