loader image
[ays_poll id=7]

४ सप्टेंबरला मनमाड येथे बरखा कविता उत्सव

Aug 30, 2022

मनमाड(प्रतिनिधी)- पुढील रविवारी म्हणजे ४ सप्टेंबर रोजी येथे बरखा कविता उत्सव होणार असून मनमाड जनहित विकास संस्था,कलाक्षर साहित्य रसिक मंच व साहित्याक्षर प्रकाशन यांच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम आय.यु.डि.पी.तील महात्मा जोतीराव फुले अभ्यासिका सभागृहात संपन्न होणार आहे.
या कार्यक्रमांतर्गत एकाच मंचावरुन दोन कार्यक्रमांचा आस्वाद काव्यरसिकांना घेता येणार आहे,पहिल्या सत्रात स.१०-००वा. ‘कवी समजून घेतांना..’ या संवादात्मक कार्यक्रमात ज्येष्ठ कवयित्री डाॕ.राजश्री देशपांडे(सातारा)यांच्यांशी काव्यगप्पा होतील तर दुपारी २-०० वा.होणा-या ‘बरखा कविता उत्सव’या कार्यक्रमात महाराष्ट्रातील नामवंत व नवोदीत युवा कवींच्या ‘पाऊसकविता’काव्यरसिकांना अनुभवता येणार आहेत.
डाॕ.राजश्री देशपांडे या मनोविकारतज्ज्ञही असून श्रोत्यांच्या काव्यविषयक व मनोव्यापारविषयक प्रश्नांना त्या उत्तरे देतील.साहित्यिक डाॕ.संजय बोरुडे हे या कार्यक्रमाचे सूत्रसंवादक असतील.
तरी या दोनही कार्यक्रमाचा आस्वाद साहित्यरसिकांनी घ्यावा असे आवाहन मनमाड जनहित विकास संस्थेचे अध्यक्ष व ज्येष्ठ पत्रकार श्री.अशोकआप्पा परदेशी, साहित्याक्षर प्रकाशनाच्या सौ.क्रांती राऊत ,समन्वयक रचना व कलाक्षरचे निमंत्रक साहित्यिक जनार्दन देवरे यांनी केले आहे.
या कविता उत्सवात उपस्थित काव्यरसिकांनाही आपली ‘पाऊसकविता’सादर करावयाची संधी मिळणार आहे.सहभागी कवींना बरखा कविता उत्सव सन्मानचिन्ह दिले जाणार आहे.यासाठी कवींनी ९३२६६६७५८० , ७०४०२३९९७० व ९८५०९७२४२६ या भ्रमणध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहनही संयोजकांनी केले आहे.

अजून बातम्या वाचा..

भुमी क्रिकेट अकॅडमीतील स्वामी दिंडे , खुशाल परळकर, गौरव निते व हसनेन शेख यांची नंदुरबार जिल्हा क्रिकेट असोसिएशन अंडर 19* संघात निवड

भुमी क्रिकेट अकॅडमीतील स्वामी दिंडे , खुशाल परळकर, गौरव निते व हसनेन शेख यांची नंदुरबार जिल्हा क्रिकेट असोसिएशन अंडर 19* संघात निवड

* BCCI अंतर्गत असलेल्या महाराष्ट्र क्रिकेट आसोसिएशन आयोजीत आमंत्रितांच्या स्पर्धेसाठी (...

read more
के आर टी हायस्कूल अँड जुनियर कॉलेजमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन साजरा करण्यात आला

के आर टी हायस्कूल अँड जुनियर कॉलेजमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन साजरा करण्यात आला

. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे प्राचार्य मुकेश मिसर यांच्या हस्ते डॉ.बाबासाहेब आंबेडकर...

read more
मार्गशीर्ष मास संकष्ट चतुर्थी निमित्त रविवार दिनांक 07/12/2025 रोजी वेशीतील श्री निलमणी गणेश मंदिरात धार्मिक कार्यक्रम

मार्गशीर्ष मास संकष्ट चतुर्थी निमित्त रविवार दिनांक 07/12/2025 रोजी वेशीतील श्री निलमणी गणेश मंदिरात धार्मिक कार्यक्रम

मनमाड शहराचे आराध्य दैवत आणि नवसाला पावणार गणपती म्हणून पंचक्रोशीत प्रसिद्ध असणाऱ्या वेशीतील श्री...

read more
सेंट झेवियर हायस्कूलमध्ये थोर समाजसुधारक, क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांची पुण्यतिथी संपन्न

सेंट झेवियर हायस्कूलमध्ये थोर समाजसुधारक, क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांची पुण्यतिथी संपन्न

मनमाड येथील सेंट झेवियर हायस्कूलमध्ये थोर समाजसुधारक, क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांची...

read more
.