loader image
[ays_poll id=7]

मनमाड महाविद्यालयात राष्ट्रीय क्रीडा दिन साजरा

Aug 31, 2022


मनमाड: येथील महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय मनमाड येथे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ अरुण पाटील यांच्या अध्यक्षतेखाली राष्ट्रीय क्रीडा दिन साजरा करण्यात आला. सर्वप्रथम हॉकीचे जादूगार मेजर ध्यानचंद यांच्या प्रतिमेचे पूजन करून महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ अरुण पाटील यांनी प्रतिमेला पुष्पहार अर्पण केला. आपल्या अध्यक्षीय मनोगतातून राष्ट्रीय क्रीडा दिनाचे औचित्य साधून खेळाचे आपल्या जीवनातील महत्त्व, तसेच हॉकीचे जादूगार मेजर ध्यानचंद यांच्या जीवन कार्याविषयी माहिती विद्यार्थ्यांना समजावून सांगितली. राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त महाविद्यालयात क्रीडा विभागाकडून प्राध्यापक व विद्यार्थ्यांसाठी फुटबॉल, खो-खो, धावणे आणि मनोरंजक खेळ असे विविध खेळांचे आयोजन करण्यात आले. यात प्राध्यापकांनी व विद्यार्थ्यांनी आपला सहभाग विविध क्रीडा प्रकारात नोंदविला. सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा संतोष जाधव यानी केले. याप्रसंगी वरिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ प्रमोद आंबेकर, कनिष्ठ महाविद्यालयाच्या उपप्राचार्य ज्योती पालवे, वरिष्ठ महाविद्यालयाचे सुपरवायझर रोहित शिंदे, कनिष्ठ विभागाचे पर्यवेक्षक विठ्ठल फंड, क्रीडा शिक्षक महेंद्र वानखेडे, कुलसचिव समाधान केदारे तसेच महाविद्यालयातील प्राध्यापक प्रशासकीय कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे संयोजन क्रीडा व शारीरिक शिक्षण विभाग यांनी केले कार्यक्रम यशस्वीतेसाठी क्रीडा संचालक प्रा. संतोष जाधव, प्रा. महेंद्र वानखेडे व खेळाडू विद्यार्थ्यांनी मेहनत घेतली.


अजून बातम्या वाचा..

मनमाड पाठोपाठ नांदगाव भाजपा मध्ये नाराजीनाट्य, सानप, छाजेड यांच्यावर कारवाईची मागणी

मनमाड पाठोपाठ नांदगाव भाजपा मध्ये नाराजीनाट्य, सानप, छाजेड यांच्यावर कारवाईची मागणी

नुकत्याच पार पडलेल्या नगरपालिका व नगरपंचायत निवडणुकीत महाराष्ट्रात नंबर एक राहिलेल्या भारतीय जनता...

read more
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या गटनेतेपदी नाईक तर विरोधी पक्षनेतेपदी नरवडे

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या गटनेतेपदी नाईक तर विरोधी पक्षनेतेपदी नरवडे

नाशिक येथे झालेल्या बैठकीत मनमाड नगर परिषदेच्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या गटनेतेपदी...

read more
फुले शाहू आंबेडकर मुस्लिम विचार मंच व मुस्लिम लायब्ररी यांच्यातर्फे फातिमाबी शेख यांची जयंती साजरी

फुले शाहू आंबेडकर मुस्लिम विचार मंच व मुस्लिम लायब्ररी यांच्यातर्फे फातिमाबी शेख यांची जयंती साजरी

म.ज्योतिबा फुले व क्रांतिज्योती सावित्रीमाई फुले यांच्या स्त्री शिक्षणाच्या कार्यात स्वतःला वाहून...

read more
.