loader image
[ays_poll id=7]

(बघा व्हिडिओ) मनमाडच्या नीलमणी बाप्पाची पालखी मिरवणूक व स्थापना थाटात संपन्न

Aug 31, 2022



मनमाड – मनमाड शहराचे आराध्य दैवत आणि नवसाला पावणारा गणपती म्हणून प्रसिध्द असणार्‍या वेशीतील श्री निलमणी गणेश मंदीरातील श्री निलमणीच्या पार्थीव मुर्तीची स्थापना मिरवणुक पालखीतून सकाळी मिरवणुकी ची परंपरा अखंडित ठेवत काढण्यात आली. मनमाड शहराच्या सांस्कृतिक व धार्मिक परंपरेमध्ये मानाचे स्थान असणार्‍या आणि आम्ही परंपरा पाळतो.. आम्ही संस्कृतीचे रक्षण करतो हे ब्रीदवाक्य घेवून काम करणार्‍या श्री निलमणी गणेश मंडळातर्फे यंदा सन १९९७ पासून सलग २६ व्या वर्षी या मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले होते यंदा मनमाड शहराच्या नूतन प्रवेशद्वार (वेश) चे नूतनीरणाचे (जीर्णोद्धार) चे निर्माण कार्य पूर्ण झाले आहे त्यामूळे या नवीन वेशीतून प्रथम मिरवणुक नेण्याचा श्री नीलमणी च्या मानाच्या पालखीला मिळाला या मानाच्या पालखी मिरवणुकीचा शुभारंभ मनमाड शहर पोलिस स्थानकाचे प्रभारी पोलिस निरिक्षक श्री प्रल्हाद गीते यांनी श्रीफळ वाढवून केला.

संस्कृती व परंपरेचे दर्शन घडविणार्‍या या मिरवणुकीत मिरवणुक मार्गावर सुशोभित रांगोळी, तसेच पालखीच्या समोर चंद्र सूर्य व भगवा ध्वज (मानाची अब्दागिरी), सनई चौघडा व वाद्यवृंद लावण्यात आले होतेे. मिरवणुकीत शंखनादासह गणपती आगमनाच्या घोषणांनी परिसर दुमदुमला. मनमाड शहरात श्री निलमणीच्या पालखी स्थापना मिरवणुकीचा शुभारंभ झाल्यानंतर इतर सार्वजनिक मंडळांमध्ये मिरवणुक निघून स्थापना करण्यात येते. मिरवणुकीच्या मुख्य मार्गावर श्री निलमणीच्या पार्थीव मुर्तीचे स्वागत करण्यात आले आणि सुवासिंनीद्वारे औक्षण करण्यात आले. मिरवणुकीमध्ये खडी साखरेचा महाप्रसाद सर्व भाविकांना वाटण्यात आला. मान्यवर पुरोहितांच्या मार्गदर्शनाने व वेदमंत्रांच्या घोषात श्री निलमणी गणेश मंदीर सार्वजनिक ट्रस्टचे विश्‍वस्त सौ. श्री गोविंद रसाळ यांच्या हस्ते पार्थीव मुर्तीची विधीवत स्थापना करण्यात आली.

या स्थापना मिरवणुकीत श्री निलमणी गणेश सार्वजनिक ट्रस्टचे विश्‍वस्त अध्यक्ष, किशोर गुजराथी, सचिव नितिन पांडे, शेखर पांगुळ, गोविंद रसाळ प्रदनेश खांदाट संदीप सिनकर, रोहित कुलकर्णी, भरत छाबडा रामदास इप्पर अक्षय सानप, अभिषेक पितृभक्त ,राहुल लांबोळे , शिवसेना जिल्हा उपप्रमुख संतोष बळीद, आझाद आव्हाड, सतीश शेकदार अशोक नारंग,अथर्व गुजराथी, सौरभ मुनोत, प्रतिक पांगुळ, अक्षय छाबडा, दिक्षा पांगुळ, जागृती आहेर, निकीता ढासे, मधुरा जोशी,सचिन वडकते, नीलकंठ त्रिभुवन, शाम शाकद्वीपी,अनिल चांदवडकर राजेश नीकुंभ अनंता कुळकर्णी, मनोज छाबडा योगेश म्हस्के यांच्यासह गणेशभक्त मोठ्या संख्येने या पालखी मिरवणुकीत सहभागी झाले. या मिरवणुकीत श्री ढोलपथकाने पारंपारिक पध्दतीने श्री निलमणी गणेश च्या पालखी सन्मुख ढोल वादनाची प्रात्यक्षिके सादर केली. दहा दिवस निलमणी गणेश मंदीरात भरगच्च धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. पालखी मिरवणुकीचे नियोजन श्री निलमणी गणेश मंदीर सार्वजनिक ट्रस्टच्या विश्‍वस्त मंडळाने केले.तर मनमाड शहर पोलिस स्टेशन च्या वतीने मिरवणुकी दरम्यान चोख बंदोवस्त ठेवण्यात आला होता.


अजून बातम्या वाचा..

मनमाड पाठोपाठ नांदगाव भाजपा मध्ये नाराजीनाट्य, सानप, छाजेड यांच्यावर कारवाईची मागणी

मनमाड पाठोपाठ नांदगाव भाजपा मध्ये नाराजीनाट्य, सानप, छाजेड यांच्यावर कारवाईची मागणी

नुकत्याच पार पडलेल्या नगरपालिका व नगरपंचायत निवडणुकीत महाराष्ट्रात नंबर एक राहिलेल्या भारतीय जनता...

read more
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या गटनेतेपदी नाईक तर विरोधी पक्षनेतेपदी नरवडे

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या गटनेतेपदी नाईक तर विरोधी पक्षनेतेपदी नरवडे

नाशिक येथे झालेल्या बैठकीत मनमाड नगर परिषदेच्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या गटनेतेपदी...

read more
फुले शाहू आंबेडकर मुस्लिम विचार मंच व मुस्लिम लायब्ररी यांच्यातर्फे फातिमाबी शेख यांची जयंती साजरी

फुले शाहू आंबेडकर मुस्लिम विचार मंच व मुस्लिम लायब्ररी यांच्यातर्फे फातिमाबी शेख यांची जयंती साजरी

म.ज्योतिबा फुले व क्रांतिज्योती सावित्रीमाई फुले यांच्या स्त्री शिक्षणाच्या कार्यात स्वतःला वाहून...

read more
.