loader image
[ays_poll id=7]

मनमाड केंद्रीय विद्यालयाची क्षेत्रीय योगासन स्पर्धेत अभुतपुर्व कामगिरी

Sep 2, 2022


मनमाड – नुकत्याच कुलाबा, मुंबई येथील केंद्रीय विद्यालयात केंद्रीय विद्यालयाच्या क्षेत्रीय स्तरीय योगासन स्पर्धा पार पाडल्या. या स्पर्धेत केंद्रीय विद्यालयाच्या मुंबई रिजन मध्ये येणाऱ्या विद्यालयांनी सहभाग नोंदवला. मुंबई, पुणे, नाशिक, जळगाव, गोवा, नागपूर येथील स्पर्धकांनी सहभाग नोंदवला. या स्पर्धेत केंद्रीय विद्यालय मनमाडच्या विद्यार्थ्यांनी अभूतपूर्व कामगिरी केली. 14 वर्षाखालील वयोगट, सतरा वर्षांखालील वयोगट व 19 वर्षांखालील वयोगट या तीन वयोगटात या स्पर्धा खेळल्या गेल्या चौदा वर्षाखालील मुलांच्या गटात हिमांशू रंजन याने प्रथम क्रमांक पटकाविला.तसेच सतरा वर्षाखालील मुलांच्या गटात राज आर्यन प्रथम, आर्यन केदारे तृतीय, कार्तिक परदेशी पाचवा आला. या सर्व विद्याथ्यांची केंद्रीय विद्यालयाच्या राष्ट्रीय योगासन स्पर्धेसाठी निवड झाली. यशस्वी विद्यार्थ्यांना केंद्रीय विद्यालयाचे योग प्रशिक्षक श्री सुनील ढमाले यांचे मार्गदर्शन लाभले.

या विद्यार्थ्यांच्या यशात केंद्रीय विद्यालयाचे प्राचार्य श्री सुनील परदेशी, क्रीडा विभाग प्रमुख श्री अनिल जिंजवाडिया तसेच क्रीडा शिक्षक हरीश चावरिया यांचा मोलाचा वाटा आहे. यशस्वी विद्यार्थ्यांचे केंद्रीय विद्यालयाचे प्राचार्य श्री सुनील परदेशी, शिक्षक विनोद माळी, महेंद्र बावरे, दिनेश जांगिड, मनोज मलासी, वैभव आहिरे, सागर होले, जयशवंत खैरनार, अमोल सर निशिकांत बोर्डे, भारती नजरधने, कविता गोसावी, सोनाली गुंडगळ, सविता वाघ, मनिषा शिंदे, आम्रपाली पवार, करुणा ठोंबरे, राजू बहोत, उल्हास महाले, शिवाजी लहाने, अर्जुन वाघ यांनी या सर्वानी अभिनंदन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या .


अजून बातम्या वाचा..

मनमाड पाठोपाठ नांदगाव भाजपा मध्ये नाराजीनाट्य, सानप, छाजेड यांच्यावर कारवाईची मागणी

मनमाड पाठोपाठ नांदगाव भाजपा मध्ये नाराजीनाट्य, सानप, छाजेड यांच्यावर कारवाईची मागणी

नुकत्याच पार पडलेल्या नगरपालिका व नगरपंचायत निवडणुकीत महाराष्ट्रात नंबर एक राहिलेल्या भारतीय जनता...

read more
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या गटनेतेपदी नाईक तर विरोधी पक्षनेतेपदी नरवडे

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या गटनेतेपदी नाईक तर विरोधी पक्षनेतेपदी नरवडे

नाशिक येथे झालेल्या बैठकीत मनमाड नगर परिषदेच्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या गटनेतेपदी...

read more
फुले शाहू आंबेडकर मुस्लिम विचार मंच व मुस्लिम लायब्ररी यांच्यातर्फे फातिमाबी शेख यांची जयंती साजरी

फुले शाहू आंबेडकर मुस्लिम विचार मंच व मुस्लिम लायब्ररी यांच्यातर्फे फातिमाबी शेख यांची जयंती साजरी

म.ज्योतिबा फुले व क्रांतिज्योती सावित्रीमाई फुले यांच्या स्त्री शिक्षणाच्या कार्यात स्वतःला वाहून...

read more
.