Breaking News

[post-marguee]

[ays_poll id=7]

फुले-आंबेडकरी शैक्षणिक विचार आचरणात यावे,स्वतःच्या धडावर स्वतःचा मेंदू असल्याशिवाय देशोन्नती अशक्य : शरद शेजवळ

Sep 6, 2022

येवला (प्रतिनिधी) : महात्मा फुले व डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे शैक्षणिक विचार कार्य अंगीकारले शिवाय गत्यंतर नसून फुले-आंबेडकरी शैक्षणिक विचार आचरणात यावेत व स्वतःच्या धडावर स्वतःचा मेंदू असल्याशिवाय देशोन्नती अशक्य आहे असे प्रतिपादन लोककवी वामनदादा कर्डक प्रतिष्ठान व अध्यापकभारती चे संस्थापक शरद शेजवळ यांनी केले.


सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग अनुसूचित जाती व नवबौद्ध मुलांचे शासकीय निवासी शाळा बाभूळगाव तालुका येवला येथे जाहीर व्याख्यान ते बोलत होते.


महाराष्ट्र शासनाच्या मा.आयुक्त समाज कल्याण पुणे, मा. प्रादेशिक उपायुक्त नाशिक विभाग नाशिक व मा सहा आयुक्त समाज कल्याण नाशिक यांच्या सुचनेनुसार विद्यार्थी ज्ञानवर्धन व माहितीसाठी देशातील सामाजिक सुधारणा तथा शैक्षणिक विचार कार्यात अतुलनीय योगदान देणाऱ्या महापुरुषांच्या कार्याची माहिती विद्यार्थ्यांना व्हावी व त्यांना शैक्षणिक अध्ययन अभ्यासात रुची निर्माण व्हावी याकरता आदर्शवत महापुरुष व महिलांच्या शैक्षणिक कार्य व योगदानाची माहिती विद्यार्थ्यांना शेजवळ यांनी यावेळी करून दिली.

विद्धे विना मती गेली मतीविना नीती गेली नितीविना गती गेली गतीविना वित्त गेले वित्तविना शूद्र खचले इतके अनर्थ एका अविद्येने केले स्त्री पुरुष सर्व कष्टकरी व्हावे कुटुंबा कोसावे आनंदाने सर्व मुली मुला शाळेत घालावे सर्वांस द्यावे विद्यादान ह्या महात्मा फुले यांच्या अनखंडाचा संदर्भ देऊन शिक्षण हे वाघिणीचे दूध असून जो ते प्राशनराशन करेल तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही, जा तुम्ही तुमच्या घराच्या भिंतीवर लिहून ठेवा की तुम्हाला या देशाची शासनकर्ती जमात बनायची आहे,विद्या विनय आणि शील याशिवाय शिक्षण व्यर्थ आहे हा डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांची आठवण ह्या वेळी शेजवळ यांनी विद्यार्थ्यांना करून देऊन फुले आंबेडकर व तमाम मानवतावादी युगपुरुष-महिला यांना डोक्यात घेऊ जीवन जगावे असे मत शेजवळ यांनी व्यक्त केले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पी.एन.पाटील होते.सुत्रसंचालन- ए.ए.येळकर मॅडम यांनी केले.एम.के.विंचू सर,एम.ए.पानपाटील सर मनोगत व्यक्त केले. आभार एस.सागरे यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विद्यालयाचे सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी परिश्रम घेतले.

अजून बातम्या वाचा..

मनमाड महाविद्यालयात स्व. रेणुकाआजी भाऊसाहेब हिरे यांना पुण्यतिथी निमित्त विनम्र अभिवादन

मनमाड महाविद्यालयात स्व. रेणुकाआजी भाऊसाहेब हिरे यांना पुण्यतिथी निमित्त विनम्र अभिवादन

मनमाड: महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय मनमाड येथे स्व. रेणुका...

read more
एच.ए.के.हायस्कूल अँन्ड ज्यु. कॉलेज,मनमाड मध्ये इ.१२ वी प्रमाणपत्र परीक्षा फेब्रुवारी / मार्च २०२४ आसनव्यवस्था जाहीर

एच.ए.के.हायस्कूल अँन्ड ज्यु. कॉलेज,मनमाड मध्ये इ.१२ वी प्रमाणपत्र परीक्षा फेब्रुवारी / मार्च २०२४ आसनव्यवस्था जाहीर

मनमाड : इ.१२ वी प्रमाणपत्र परीक्षा फेब्रुवारी / मार्च २०२४ केंद्र क्रमांक ०२३६ एच.ए.के. हायस्कूल...

read more
नांदगाव महाविद्यालयात विद्यार्थी खळखळून हसले आणी तणाव मुक्त झाले ./ गुनवंत विद्यार्थ्याचा सन्मान

नांदगाव महाविद्यालयात विद्यार्थी खळखळून हसले आणी तणाव मुक्त झाले ./ गुनवंत विद्यार्थ्याचा सन्मान

नांदगाव : मारुती जगधने अनमोल क्षणांचा आनंद घ्या नाराज होऊ नका ध्येयाची वाटचाल निश्चित करा यश तुमचे...

read more
आ.सुहास अण्णा कांदे यांच्यावतीने मनमाड शहर शिवसेनेतर्फे बौद्ध विधी उपासक (बौद्धाचार्य) यांचा सपत्नीक सत्कार व सन्मान

आ.सुहास अण्णा कांदे यांच्यावतीने मनमाड शहर शिवसेनेतर्फे बौद्ध विधी उपासक (बौद्धाचार्य) यांचा सपत्नीक सत्कार व सन्मान

आमदार सुहास आण्णा कांदे यांच्या प्रयत्नातून मनमाड शहरात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा 7...

read more
आधुनिक तंत्रज्ञानाच्या जोडीने दिव्यांग बांधवांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी सरकार कटिबद्ध : डॉ. भारती पवार

आधुनिक तंत्रज्ञानाच्या जोडीने दिव्यांग बांधवांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी सरकार कटिबद्ध : डॉ. भारती पवार

केंद्रीय सामाजिक न्याय आणि अधिकारीता मंत्रालय, दिव्यांग सशक्तिकरण विभागाअंतर्गत जिल्हा...

read more
[hsas-shortcode group="" speed="10" direction="left" gap="50"]