loader image

मेडिकव्हर हॉस्पिटल तर्फे ट्रॅफिक बॅरिगेट्स हस्तांतरीत सोहळा संप्पन्न

Sep 9, 2022


नाशिक प्रतिनिधी : मेडिकव्हर हॉस्पिटल हा जागतिक स्तरावर मान्यता प्राप्त आरोग्यसेवा देणारा समूह आहे आणि १२ देशांमध्ये आरोग्य सेवा प्रदान करत आहे. जर्मनी, स्वीडन, पोलंड, तुर्की, बेलारूस, बल्गेरिया, जॉर्जिया, हंगेरी, रोमानिया, सर्बिया, मोल्दोव्हा, युक्रेन आणि भारत. अशोका मेडीकव्हर हॉस्पिटल हे भारतातील आघाडीचे मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल समूहाचा भाग आहे. मेडिकव्हर रुग्णालये तेलंगणा, आंध्र प्रदेश आणि महाराष्ट्रात पसरलेली आहेत आणि दरवर्षी लाखो रुग्णांवर या रुग्णालयातून उपचार करण्यात येतात. भारतातील आरोग्य सेवेचा दर्जा उंचावण्यावर आमचे विशेष लक्ष आहे. यामध्ये वैद्यकीय क्षेत्रातील नामवंत व अनुभवी डॉक्टरांचा सहभाग आमच्या समूहात आहे. अद्ययावत तंत्रज्ञान आणि आंतरराष्ट्रीय माहितीच्या आधारावर व प्रोटोकॉल नुसार आम्ही कार्य करत आहोत.

आरोग्यसेवा करत असताना सामाजिक जाणीव ठेऊन मेडिकव्हर समूह समाजातील घटकासाठी नेहमी आपले दायित्व जपत आले आहे,याच अनुषंगाने सामाजिक बांधिलकी जपत वाहतूक सुरक्षा अभियान अंतर्गत वाहतूक विभागासाठी शहरातील रहदारी सुरक्षित व सुरळीत राहावी, यासाठी अशोका मेडिकव्हर हॉस्पिटल यांच्या वतीने ट्रॅफिक बॅरिगेट्स हस्तांतरित सोहळ्याचे आयोजन दिनांक ८ सप्टेंबर २०२२ रोजी दुपारी ५ :०० वाजता अशोका मेडिकव्हर हॉस्पिटल येथे करण्यात आले होते . हा सोहळा माननीय पोलीस आयुक्त श्री जयंत नाईकवरे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला , या प्रसंगी पोलीस उपायुक्त श्री अमोल तांबे यांनी उपस्थित समूहास संबोधित करताना असे म्हणाले कि, ट्रॅफिक बॅरिगेट्स मुळे शहरातील वाहतूक नियोजन करत असताना वाहतूक सुरक्षित आणि सुरळीत होण्यास निश्चितच मदत होणार आहे या हस्तांतर सोहळ्यास मेडिकल डायरेक्टर डॉ सुशील पारख , मेंदू विकार शस्रक्रिया तज्ञ् डॉ शेखर चिरमाडे , केंद्र प्रमुख समीर तुळजापूरकर ,व अशोका मेडिकव्हर हॉस्पिटलचे डॉक्टर , पदाधिकारी आणि कर्मचारी मोठ्या संख्येने या सोहळ्यास उपस्थित होते.


अजून बातम्या वाचा..

ग्रंथालयांच्या अडचणी सोडवण्यासाठी शासन प्रयत्नशील उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील

ग्रंथालयांच्या अडचणी सोडवण्यासाठी शासन प्रयत्नशील उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील

  पुणे - जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत ग्रंथालयांना अनुदान उपलब्ध करून देण्यासाठी, शासन प्रयत्न...

read more
मनमाड येथे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षातर्फे पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा तीव्र निषेध.

मनमाड येथे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षातर्फे पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा तीव्र निषेध.

मनमाड, दि. २५ एप्रिल २०२५: जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे नुकत्याच घडलेल्या भीषण दहशतवादी हल्ल्याचा...

read more
भीमोत्सव समिती आयोजित प्रसिद्ध खंजिरी वादक मीरा उमप यांच्या गीतांची मैफल संपन्न

भीमोत्सव समिती आयोजित प्रसिद्ध खंजिरी वादक मीरा उमप यांच्या गीतांची मैफल संपन्न

मनमाड - डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त भीमोत्सव आयोजन समितीच्या वतीने आयोजित करण्यात...

read more
.