loader image

बघा व्हिडिओ – मनमाडला पोलिसांनी केले पाच चोरटे जेरबंद

Sep 26, 2022


 

मनमाड शहरातील जनता सातत्याने होत असलेल्या मोटार सायकलचोरीने त्रस्त झाले असतांना,काही दिवसांपासून घरातील चोऱ्यांचे प्रमाण वाढले असल्याने पोलिसांनी कड़क पाऊले उचलत शोध मोहिम सुरु केली असून पाच जणांना ताब्यात घेतल्याची माहिती मिळाली आहे.दरम्यान गेल्या आठ दिवसापासून अश्विनी नगर भागात चोरटयानी अक्षरशा धुमाकूळ घातल्याने नागरिकात घबराट पसरली आहे.त्यामुळे नागरिकांनी पोलिसांच्या कार्यपद्धतीवर तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.त्यामुळे या चोरी झालेल्या जवळपास कुठे सीसीटीव्ही कॅमेरे वगैरे असल्याबाबत चौकशी सुरु केली असता शहरातील अश्विनी नगर भागात अनेक ठिकाणी घरफोड्या होत असून एका घरात तर नवऱ्याला घरात कोंडून बाईला बाहेर नेऊन अंगावरचे दागिने ओरबडून नेले.तर येथील संजय पांडे यांच्या घरी चोरट्यांनी तीन दिवसांपूर्वी आजूबाजूच्या घरांच्या कड्या लावून पांडे यांच्या घरी चोरीचा प्रयत्न केला परंतु तो फसला.मात्र घरातील सीसीटीव्हीमुळे चोरटे हाती लागले.यानंतर पोलिसांनी तपासाला सुरुवात केली असता पांडे यांच्या घराला सीसीटीव्हीच्या कॅमेऱ्यात भामटे दिसून आल्याने पोलिसांनी तपासाअंती पाचही भामटयांना अटक केली तर त्यांच्याकडून अनेक गुन्हे उघड होण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे.


अजून बातम्या वाचा..

भाजपा च्या नाशिक उत्तर जिल्हा उपाध्यक्ष पदी नितीन पांडे तर जिल्हा चिटणीस पदी जयकुमार फुलवाणी यांची नियुक्ती

भाजपा च्या नाशिक उत्तर जिल्हा उपाध्यक्ष पदी नितीन पांडे तर जिल्हा चिटणीस पदी जयकुमार फुलवाणी यांची नियुक्ती

भाजपा च्या नाशिक उत्तर जिल्हा उपाध्यक्ष पदी नितीन पांडे तर जिल्हा चिटणीस पदी जयकुमार फुलवाणी यांची...

read more
अश्विन मास संकष्ट चतुर्थी निमित्त शुक्रवार दिनांक 10/020/2025 रोजी वेशीतील श्री निलमणी गणेश मंदिरात धार्मिक कार्यक्रम

अश्विन मास संकष्ट चतुर्थी निमित्त शुक्रवार दिनांक 10/020/2025 रोजी वेशीतील श्री निलमणी गणेश मंदिरात धार्मिक कार्यक्रम

मनमाड शहराचे आराध्य दैवत आणि नवसाला पावणार गणपती म्हणून पंचक्रोशीत प्रसिद्ध असणाऱ्या वेशीतील श्री...

read more
.