मनमाड शहरातील गुरुद्वारात एका अनोळखी इसमाचा मृतदेह आढळून आल्याने खळबळ माजली. गुरुजीत सिंग कांत वय ७१ यांनी दिलेल्या खबरीवरून पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. ४ ऑक्टोंबर रोजी १० वाजे पूर्वी हा प्रकार लक्षात आला. मनमाड गुरुद्वराचा लंगर हॉल वरील गच्चीवर मोकळ्या जागेत एका अनोळखी इसमाचा मृतदेह आढळून आला.वय अंदाजे २० ते २५ वर्षे, अंगात काळे निळे पट्टे असलेला शर्ट निळ्या रंगाची काळे निळे पट्टे असलेली पँट परिधान केलेली आहे. ह्या इसमाबद्दल कोणाला काही माहिती असल्यास त्यांनी शहर पोलीस ठाण्यात संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे. पोलिस नाईक एस.के.धुमाळ पुढील तपास करीत आहेत.
शाळा प्रवेशासाठी आता पुढील शैक्षणिक वर्षापासून वयोमर्यादा निश्चित
राष्ट्रीय शिक्षण धोरणानुसार राज्य शासनाने इयत्ता पहिली पर्यंतच्या प्रवेशाच्या वयोमर्यादा निश्चित...











