loader image

सिद्धी संदीप देशपांडे हिच्या कासव कवितेला द्वितीय पुरस्कार

Oct 17, 2022


मनमाड ( प्रतिनिधी) नाशिक येथील सारथ्य मानसोपचार व व्यसनमुक्ती केंद्रातर्फे ” मनातील कविता आणि कवितेतील मन “या विषयावर आयोजित अभिनव अशा राज्यस्तरीय काव्य लेखन स्पर्धेत मनमाड येथील प्रसिद्ध कवी पत्रकार आणि प्रकाशक संदिप देशपांडे यांची कन्या सिद्धी हिच्या माझ्यातील कासव या कवितेस दुसऱ्या क्रमांकाचा पुरस्कार मिळाला. साहित्य अकादमी पुरस्कार विजेते लेखक, नाटककार संगीत देवबाभळी फेम प्राजक्त देशमुख यांच्या हस्ते,साहित्यिक राजू देसले व मान्यवरांच्या हस्ते पारितोषिक वितरण झाले.
रोख रुपये 2 हजार,सन्मानचिन्ह,सन्मान पत्र हे पारितोषिक सिद्धीच्या वतीने संदिप देशपांडे यांनी स्वीकारले. पुण्याला असलेल्या लेकीचा पुरस्कार नाशिक ला स्वीकारताना कवी संदीप देशपांडे यांना गहिवरून आले. व अभिमानही वाटला. विशेष म्हणजे ही कविता सादर करण्याचा मान संदिप देशपांडे या सोहळ्यात मिळाला. तिच्या या यशाबद्दल सर्वत्र कौतुक व अभिनंदन केले जात आहे.ठिणगी न्यूज पोर्टल तर्फे अभिनंदन


अजून बातम्या वाचा..

नांदगाव आणि मनमाड शहरात वाढती वाहतूक; वळण रस्त्याची तातडीने गरज – आमदार सुहास कांदे यांची विधानसभेत जोरदार मागणी

नांदगाव आणि मनमाड शहरात वाढती वाहतूक; वळण रस्त्याची तातडीने गरज – आमदार सुहास कांदे यांची विधानसभेत जोरदार मागणी

नांदगाव आणि मनमाड शहरात वाढती वाहतूक; वळण रस्त्याची तातडीने गरज – आमदार सुहास कांदे यांची...

read more
.