loader image

कनाशी येथील शबरीमाता आश्रमास मनमाडकरांची दिवाळी भेट….

Oct 21, 2022


मनमाड 🙁 योगेश म्हस्के ) दरवर्षी प्रमाणे मनमाडच्या वनवासी कल्याण आश्रम शाखेच्या वतीने कनाशी येथील आश्रमास भेट देऊन तेथील ३१ विद्यार्थिनी आणि व्यवस्थापिका व मार्गदर्शक यांना दीपावली निमित्त नविन कपडे,मिठाईचे पदार्थ भेट देण्यात आले.

या कार्यक्रमाच्या निमित्ताने मनमाडहून पंचवीस कार्यकर्ते कनाशी येथे गेले होते , कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी जेष्ठ कार्यकर्ते रंगनाथजी कीर्तने हे होते.सुरुवातीला दीप प्रज्वलन ,प्रतिमा पूजन झाल्यानंतर आश्रमातील मुलींनी स्वागत गीत सादर करून उपस्थितांची मने जिंकून घेतली , मनमाड शाखेचे अध्यक्ष प्रकाश कुलकर्णी यांनी कल्याण आश्रमाच्या कार्याची माहिती,मनमाड शाखेचे योगदान मनमाडकर देणगी दारांची नियमित दातृत्वाचे सातत्य आणि त्यातून कनाशी आश्रमाशी वाढलेला स्नेह यातून परस्परांमध्ये निर्माण झालेले अतूट नाते यासंबंधी विवेचन केले . आजच्या उपक्रमास ही या सर्व वस्तू गोळा करताना श्री सुधीर पाटील ,लायन्स क्लब चे हर्षद गद्रे आणि सौ साधना पाटील आणि त्यांच्या माध्यमातून मनमाड रण रागिणी क्लबच्या सर्व महिला कार्यकर्त्या तसेच डॉ शिंगी,डॉ डोंगरगावकर, प्रवीण सैतवाल,श्रीधर सांगळे, गणेश व्यवहारे,डॉ कातकडे,सुभाष खिस्ते,झांबरे सर,वैभव कुलकर्णी इत्यादी मंडळींची भरघोस मदत झाली याचा कुलकर्णी यांनी आवर्जून उल्लेख केला.

 

त्यानंतर तेथील व्यवस्थापिका यशोदाबाई गावित यांनी सर्वांचे आभार मानताना हा एक कौटुंबीक सोहळा असून आपण जे सातत्यपूर्ण सहकार्य करता हे असेंच असावे ज्यामुळे आसपासच्या पाड्यातील मुलींनां ही पुढील काळात मदत मिळावी अशी अपेक्षा व्यक्त केली ,
याच ठिकाणी जिल्हा स्तरावरील खेलकूद प्रकल्पा अंतर्गत जिल्हा युनिटचे खो खो चे सामने खेळले गेले त्यातील विजेत्या आणि उप विजेत्या संघाना मनमाडकरांच्या वतीने भरघोस बक्षिसे ही देण्यात आली. दिवसभराच्या अंत्यन्त आत्मिकतेने भारलेल्या वातावरणातून निरोप घेताना सर्वांचेच डोळे पाणावले होते.
सहल वजा सेवाकार्य असा दुहेरी हेतू ठेवून आखलेला हा अनोखा उपक्रम यशस्वी तर झालाच पण यातून पुढील सेवा कार्याची पेरणी ही झाली असे निश्चित म्हणता येईल कारण उपस्थित पंचवीस जणांपैकी सर्वच कार्यकर्ता भूमिकेतून काम करतील ही अपेक्षा नव्हे खात्री आहे कारण श्री व सौ भागवत,श्री व सौ हातेकर गणेश व्यवहारे,रंगनाथजी कीर्तने यांचे सुपुत्र आणि सुन बाई ,सौ गोडबोले, हेमंत पेंडसे,मंगलदास भावसार ,घोरपडे सर,रेल्वेतील सेवानिवृत्त अधिकारी जांबोरे साहेब,ऍड एम जी बापट ,डी टी पवार सर,प्रयोगशील शेतकरी श्रीधर सांगळे असे सर्व कार्यकर्ते जोमाने कार्यरत आहेत ही जमेची बाजू आहे, हे सर्व कार्य करत असताना माजी अध्यक्ष देविदास चांदवडकर सर,प्रकाश गाडगीळ सर यांचे नियमित मार्गदर्शन लाभत असते.


अजून बातम्या वाचा..

 फलक रेखाटन विशेष दिनांक : ६ जुलै २०२५ – आषाढी एकादशी स्थळ : नूतन माध्यमिक विद्यालय, भाटगाव (ता. चांदवड, जि. नाशिक)

 फलक रेखाटन विशेष दिनांक : ६ जुलै २०२५ – आषाढी एकादशी स्थळ : नूतन माध्यमिक विद्यालय, भाटगाव (ता. चांदवड, जि. नाशिक)

  महाराष्ट्राच्या सांस्कृतिक आणि अध्यात्मिक ओळखीचा अविभाज्य भाग म्हणजे आषाढी एकादशीची वारी —...

read more
“विकसित महाराष्ट्र २०४७” साठी शेतकऱ्यांचा सहभाग महत्वाचा; शासनाचे व्हिजन डॉक्युमेंट तयार करण्याची प्रक्रिया सुरू

“विकसित महाराष्ट्र २०४७” साठी शेतकऱ्यांचा सहभाग महत्वाचा; शासनाचे व्हिजन डॉक्युमेंट तयार करण्याची प्रक्रिया सुरू

  नांदगाव: मारुती जगधने महाराष्ट्र शासनाने "विकसित भारत २०४७" या राष्ट्रीय उद्दिष्टानुसार...

read more
मनमाड महाविद्यालयात स्व.लोकनेते व्यंकटराव हिरे यांच्या पुण्यतिथी निमित्त प्रतिमा पूजन व वृक्षारोपण संपन्न

मनमाड महाविद्यालयात स्व.लोकनेते व्यंकटराव हिरे यांच्या पुण्यतिथी निमित्त प्रतिमा पूजन व वृक्षारोपण संपन्न

मनमाड = कला,विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय, मनमाड येथे शिक्षण महर्षी, महात्मा गांधी विद्यामंदिर व...

read more
.