loader image

मनमाड ला दिवाळी सण उत्साहपूर्ण वातावरणात साजरा

Oct 25, 2022


मनमाड 🙁 योगेश म्हस्के ) भारतात साजऱ्या केल्या जाणाऱ्या सणांमध्ये सर्वात प्रसिद्ध आणि महत्वाचा उत्सव म्हणजे दिवाळी , भारतात सर्व धर्मीय लोक दिवाळी मोठ्या आनंदात साजरी करतात. असे म्हटले जाते कि “दिवाळी” रोषणाई, उल्हास, उत्सवाचा, प्रेमानी भरलेला, मैत्रीचा आणि मानवतेने भरलेला उत्सव आहे.

दरवर्षी दिवाळी अंधाऱ्या रात्रीत जगमगत्या दिव्यांनी व आकाश कंदील आणि फटाक्यांच्या रोषनाईनी याच्या दिव्यतेचा अंदाज येतो. दिवाळीत संपूर्ण घराला सजवले जाते. घरी बनवलेली मिठाई आदान प्रदान केले जाते. भारतात सर्व लोक घराला दिव्यांच्या उजेडाने भरून टाकतात.दिवाळीचा दिवस हा तोच दिवस मानला जातो ज्या दिवशी भगवान श्रीराम हे रावणाचा वध करून माता सीतासह अयोद्धयाला परतले होते. त्यांच्या स्वागतासाठी अयोद्धयावासियांनी रोषणाई व दीपक लावून मोठ्या आनंदात तो दिवस साजरा केला होता.असे म्हटले जाते कि शाही आदेशानुसारच श्रीराम व माता सीता यांचे अयोद्धया पासून ते मिथीला पर्यंत संपूर्ण प्रदेश दिव्यांच्या रोषनाई ने जगमगुण गेला होता. अशा प्रकारे त्या अंधाऱ्या रात्रीला दिव्यांच्या प्रकाशाने उजाळून टाकले होते.
दिवाळीला आम्रपर्नाचे तोरण व झेंडूच्या फुलांचे तोरण मुख्यप्रवेश द्वारावर लावले जाते. अंगणात मुख्य प्रवेश द्वारा समोर वेगवेळ्या रंगांच्या रांगोळ्या काढल्या जातात.
त्याच बरोबर घरात चारही बाजूंना तेलाचे दिपक एका रांगेत ठेवून घर सजवले जाते. त्यामुळे दिवाळीला “दिपोत्सव” म्हणूनही ओळखली जाते.

मनमाड शहरात देखील दिवाळी मोठ्या आनंदात नागरिकांकडुन साजरी करण्यात आली.दिपोत्सव ,फटाके ,फराळ , मिठाई ,स्नेहांचा भेटी घेऊन दिपावली सण साजरा करण्यात आला.शहरातील मंदिरे आणि प्रसिद्ध असणाऱ्या गुरुद्वारा मध्ये दिपोत्सव , फटाक्यांची आतिषबाजी करून दिवाळी साजरी करण्यात आली.


अजून बातम्या वाचा..

नांदगाव आणि मनमाड शहरात वाढती वाहतूक; वळण रस्त्याची तातडीने गरज – आमदार सुहास कांदे यांची विधानसभेत जोरदार मागणी

नांदगाव आणि मनमाड शहरात वाढती वाहतूक; वळण रस्त्याची तातडीने गरज – आमदार सुहास कांदे यांची विधानसभेत जोरदार मागणी

नांदगाव आणि मनमाड शहरात वाढती वाहतूक; वळण रस्त्याची तातडीने गरज – आमदार सुहास कांदे यांची...

read more
.