loader image

मनमाड नगर परिषेकडून शहरात कचरा वर्गीकरण जनजागृती

Oct 26, 2022


मनमाड – मनमाड नगर परीषदेचे मुख्याधिकारी डॉ सचिनकुमार पटेल, आरोग्य निरीक्षक विजयकुमार सोनवने यांच्या मार्गदर्शनाखाली
शहरातील विविध भागांमध्ये मध्ये जनजागृती केली.
या सर्व भागामध्ये एकूण 413 भागधारकांची कचरा वर्गीकरण याबाबतीत जनजागृती केली.
या सर्व भागधारकांना कचऱ्याचे घटक समजावून सांगण्यात आले. ओला कचरा, सुका कचरा आणि घातक कचरा तसेच यामध्ये येणाऱ्या घटकांची सविस्तर माहिती दिली.

1)जो कुजतो तो ओला कचरा ओल्या कचरामध्ये फळांच्या साली, अंड्याची टरफले, उरलेले शिळे अन्न, मटण आणि चिकन व त्याची उरलेली हाडे, चहा पावडर, पानांची पत्रावळी, फुले व फुलांचे हार, केसांची गुंतावळ, नारळाची करवंटी, भाज्यांचे देठ, पालापाचोळा, पाने, शेंगाची टरफुले, उसाचा चोथा, गवत, फांद्या, मक्याचे कणीस, गव्हाचा कोंडा, इत्यादी घटकांचा समावेश होतो.

2) जो कुजत नाही तो सुका कचरा याचा पुनर्वापर होऊ शकतो यामध्ये पुठ्ठा, प्लास्टिक, कागद, प्लास्टिक बॉटल, कपडे, जुने चप्पल/बूट, सिरॅमिक वस्तू, लोखंड, थर्मकोल, चॉकलेट/बिस्कीट ची रॅपर, रिकामी दूध पिशवी, इत्यादी घटकांचा समावेश होतो.

3) घातक कचरा यामध्ये सिरीज, वापरलेले ब्लेड, सॅनिटरी पॅड/नॅपी, फुटलेले ब्लब, प्रेग्नन्सी किट, खराब बॅटरी/सेल, मुदत सम्पलेली गोळ्या व औषधे, फुटलेल्या काचा व इत्यादी घटकांचा समावेश घातक कचऱ्यामध्ये होतो.
घातक कचरा हा घंटागाडी हेल्पर कडे कागदात गुंडाळून वेगळं द्यावा अशी माहिती सांगितली.

कचरा वर्गीकरण करून घंटागाडीतच टाकावा तसेच तो इकडेतिकडे उघड्यावर किंवा कचराकुंडीत टाकू नये, अशी माहिती देण्यात आली. यावेळी आरोग्य निरीक्षक विजयकुमार सोनवने , शहर समन्वयक अर्चना बागुल, दिलीप थोरे, सतिश चावरीया आदी उपस्थित होते.


अजून बातम्या वाचा..

 फलक रेखाटन विशेष दिनांक : ६ जुलै २०२५ – आषाढी एकादशी स्थळ : नूतन माध्यमिक विद्यालय, भाटगाव (ता. चांदवड, जि. नाशिक)

 फलक रेखाटन विशेष दिनांक : ६ जुलै २०२५ – आषाढी एकादशी स्थळ : नूतन माध्यमिक विद्यालय, भाटगाव (ता. चांदवड, जि. नाशिक)

  महाराष्ट्राच्या सांस्कृतिक आणि अध्यात्मिक ओळखीचा अविभाज्य भाग म्हणजे आषाढी एकादशीची वारी —...

read more
“विकसित महाराष्ट्र २०४७” साठी शेतकऱ्यांचा सहभाग महत्वाचा; शासनाचे व्हिजन डॉक्युमेंट तयार करण्याची प्रक्रिया सुरू

“विकसित महाराष्ट्र २०४७” साठी शेतकऱ्यांचा सहभाग महत्वाचा; शासनाचे व्हिजन डॉक्युमेंट तयार करण्याची प्रक्रिया सुरू

  नांदगाव: मारुती जगधने महाराष्ट्र शासनाने "विकसित भारत २०४७" या राष्ट्रीय उद्दिष्टानुसार...

read more
मनमाड महाविद्यालयात स्व.लोकनेते व्यंकटराव हिरे यांच्या पुण्यतिथी निमित्त प्रतिमा पूजन व वृक्षारोपण संपन्न

मनमाड महाविद्यालयात स्व.लोकनेते व्यंकटराव हिरे यांच्या पुण्यतिथी निमित्त प्रतिमा पूजन व वृक्षारोपण संपन्न

मनमाड = कला,विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय, मनमाड येथे शिक्षण महर्षी, महात्मा गांधी विद्यामंदिर व...

read more
.