loader image

बघा व्हिडिओ – मनमाड-मुंबई पंचवटी’ एक्सप्रेसचा ’47 वा’ वाढदिवस साजरा

Nov 1, 2022

मनमाड : ( योगेश म्हस्के )मनमाड ते मुंबई दररोज प्रवास करणाऱ्या शेकडो प्रवाशांची जीवनवाहिनी असणाऱ्या पंचवटी एक्सप्रेसचा 47 वा वाढदिवस आज मोठ्या उत्साहात मनमाड रेल्वे स्टेशन येथे पावरकार स्टाफ , ईटीयल स्टाफ आणि प्रवाशांचा वतीने साजरा करण्यात आला.

मनमाड ते मुंबई धावणाऱ्या पंचवटी एक्सप्रेस ही गाडी 1 नोव्हेंबर 1975 रोजी सुरू करण्यात आली होती , मनमाड ते मुंबई दररोज प्रवास करणाऱ्या शेकडो चाकरमान्यांची जीवनवाहिनी असणाऱ्या पंचवटी एक्सप्रेसला आज 47 वर्ष पूर्ण झाले असुन , या निमित्ताने गाडीला फुले व फुग्यांनी सजवून , मान्यवरांच्या हस्ते श्रीफळ फोडुन आणि पेढे वाटुन मोठया थाटामाटात पंचवटी एक्सप्रेसचा वाढदिवस साजरा करण्यात आला.

या कार्यक्रमास प्रमुखअतिथी म्हणुन अरुण कुमार (SSC ETL) , आर. पी. सोनवणे (JE) , दिपक पवार (loco Inspector) हे लाभले होते . कार्यक्रमाचे आयोजन रोहित भालेराव , पावर स्टाफ , ईटीयल स्टाफ यांच्या वतीने करण्यात आले , यावेळी ज्ञानेश्वर म्हैसे , नितीन वरकड , दिपक बारे ,सम्यक आहिरे , शुभम आहिरे , सतीश झालटे , समीर खान , बघेल साहेब आदी उपस्थित होते.

अजून बातम्या वाचा..

 फलक रेखाटन विशेष दिनांक : ६ जुलै २०२५ – आषाढी एकादशी स्थळ : नूतन माध्यमिक विद्यालय, भाटगाव (ता. चांदवड, जि. नाशिक)

 फलक रेखाटन विशेष दिनांक : ६ जुलै २०२५ – आषाढी एकादशी स्थळ : नूतन माध्यमिक विद्यालय, भाटगाव (ता. चांदवड, जि. नाशिक)

  महाराष्ट्राच्या सांस्कृतिक आणि अध्यात्मिक ओळखीचा अविभाज्य भाग म्हणजे आषाढी एकादशीची वारी —...

read more
“विकसित महाराष्ट्र २०४७” साठी शेतकऱ्यांचा सहभाग महत्वाचा; शासनाचे व्हिजन डॉक्युमेंट तयार करण्याची प्रक्रिया सुरू

“विकसित महाराष्ट्र २०४७” साठी शेतकऱ्यांचा सहभाग महत्वाचा; शासनाचे व्हिजन डॉक्युमेंट तयार करण्याची प्रक्रिया सुरू

  नांदगाव: मारुती जगधने महाराष्ट्र शासनाने "विकसित भारत २०४७" या राष्ट्रीय उद्दिष्टानुसार...

read more
मनमाड महाविद्यालयात स्व.लोकनेते व्यंकटराव हिरे यांच्या पुण्यतिथी निमित्त प्रतिमा पूजन व वृक्षारोपण संपन्न

मनमाड महाविद्यालयात स्व.लोकनेते व्यंकटराव हिरे यांच्या पुण्यतिथी निमित्त प्रतिमा पूजन व वृक्षारोपण संपन्न

मनमाड = कला,विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय, मनमाड येथे शिक्षण महर्षी, महात्मा गांधी विद्यामंदिर व...

read more
.