मनमाड : (योगेश म्हस्के)वेळ दुपारची प्रवाशांनी नेहेमीच गजबजलेले ठिकाण म्हणजे मनमाड रेल्वे स्थानक येथील रेल्वे तिकीट कार्यालय परिसर , येथे अचानक पणे कुठुन तरी वानराचे म्हणजेच माकडाचे आगमन झाले , बराच वेळ हे वानर रेल्वे तिकीट काढणाऱ्या कार्यालय परिसरात बसुन होते.
येथील अनेक प्रवाशी याच्याकडे पाहत होते , तर त्याच्याकडे कोणाचे दुर्लक्ष होत होते , तर काही जण आपल्या मोबाईल मध्ये त्याचे फोटो घेत होते.वानर बराच वेळ येणाऱ्या-जाणाऱ्या प्रवाशांकडे एक टक बघत होतो , जणु काही कदाचित त्याला कोणा कडुन काही मदत होते का या भावनेने , वानर किंवा माकड यांची जात ही तशी अतिशय चंचल म्हणुन प्रसिद्ध आहे ते नेहेमी इकडे-तिकडे उड्या मारत फिरत असतात , परंतु हे वानर बराच वेळ एकाच ठिकाणी बसून होते , त्याच्याकडे बघुन हे अतिशय दमलेले किंवा आजारी अवस्थेत असावे असे वाटत होते. सध्या मोठ्या प्रमाणात जंगल तोड झाल्याने अनेक जंगली प्राणी हे शहराच्या दिशेने आपला प्रवास करून तिथेच आपला अधिवास निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत , यामध्ये जंगली प्राणी आणि मनुष्य यांचा संघर्ष होताना देखील आपण अनुभवत आहोत आणि या सर्व संघर्षात हानी देखील जंगली प्राण्यांची होत आहे.
असेच हे थकलेले माकड कदाचित त्याला मदतीच्या अपेक्षेने रेल्वे स्टेशन येथे बराच वेळ बसुन होते , कोणी मनुष्य आपली काही मदत करेल का काय या भावनेने वाट बघत असावे , परंतु येणाऱ्या-जाणाऱ्या प्रत्येक मनुष्याच्या व्यस्त वेळेतुन आपल्याला कोणी मदत नाही करणार हे समजुन ते वानर काही वेळाने तेथुन अदृश्य झाले.