Breaking News

[post-marguee]

[ays_poll id=7]

श्री स्वामी समर्थ केंद्रामध्ये वैकुंठ चतुर्दशी निमित्ताने “श्री हरी-हर” भेट संपन्न….

Nov 7, 2022

मनमाड : ( योगेश म्हस्के )कार्तिक शुक्ल चतुर्दशी ही तिथी वैकुंठ चतुर्दशी या नावेही ओळखली जाते. असे म्हणतात, की या तिथीला ब्रह्ममुहूर्तावर भगवान महाविष्णूंनी वाराणसीच्या मणिकर्णिका घाटावर स्नान केले होते आणि भगवान शंकरांची प्रार्थना केली होती. त्या पूजेने भोलेनाथ एवढे प्रसन्न झाले, की त्यांनी प्रत्यक्ष हरीची भेट घेतली आणि प्रसन्न होऊन वर दिला, की यादिवशी जे विष्णू भक्त किंवा शिव भक्त मनोभावे भगवंताची आळवणी करतील, त्यांना वैकुंठप्राप्त होईल.

वैकुंठ चतुर्दशीलाच काशी विश्वनाथ स्थापना दिवस असेही म्हणतात. यादिवशी भगवान विष्णू आणि महादेव यांची प्रार्थना केली जाते व षोडशोपचार पूजा करून स्तोत्रपठण केले जाते. आषाढी एकादशीला भगवान महाविष्णू झोपतात, ते थेट कार्तिकी एकादशीला उठतात, असे म्हटले जाते. विष्णूंच्या अनुपस्थितीत त्यांची वैश्विक जबाबदारी भगवान शंकर सांभाळतात. याबद्दल कृतज्ञता म्हणून विष्णू महादेवाला फळे, फुले आणि बेल वाहतात, तर महादेवदेखील विष्णूंना प्रिय असलेली तुळशी वाहून जागे करतात.वैकुंठ चतुर्दशीला सकाळी स्नान करून हरी-हर स्तोत्र म्हणतात. अन्यथा विष्णूंची सहस्र नावे घेऊन बेल आणि महादेवांना रुद्र म्हणत तुळशीची पाने अर्पण केली जातात. इतर वेळी शंकराला बेल आणि विष्णूंना तुळस वाहतो, परंतु या भेटीचे आगळे वेगळे महत्त्व म्हणून अशी पूजा केली जाते.

  

 

मनमाड येथील दिंडोरी प्रणित श्री स्वामी समर्थ केंद्रामध्ये हरी-हर भेट पुजा संपन्न करण्यात आली.यावेळी भाविकांकडुन रात्री बारा वाजता श्री महाविष्णूंच्या फोटोला शिव नामावली मंत्र म्हणुन 108 बेलपत्र वाहण्यात आले , तर सकाळी 6 वाजता श्री महादेव पिंडीला श्री विष्णु सहस्त्रनामावली म्हणुन 1000 तुळशी पत्र वाहण्यात आले.याप्रसंगी श्री स्वामी समर्थ सेवा केंद्रातील सेवेकरी उपस्थित होते.

अजून बातम्या वाचा..

आर्थिकदृष्ट्या गरीब नागरिकांना अंत्यविधीसाठी मोफत लाकडे उपलब्ध करावी – रिपाइं

आर्थिकदृष्ट्या गरीब नागरिकांना अंत्यविधीसाठी मोफत लाकडे उपलब्ध करावी – रिपाइं

मनमाड शहरात मोठ्याप्रमाणावर रोजंदारीवर काम करणारे नागरिक असून परिवारातील एखाद्या सदस्यांचे निधन...

read more
विद्यार्थ्याने शाळा सोडल्यानंतर दाखला आणि जनरल रजिस्टर दुरुस्ती अधिकार शिक्षणाधिकाऱ्यांना – मा. मुंबई उच्च न्यायालयाचा दिलासादायक निकाल

विद्यार्थ्याने शाळा सोडल्यानंतर दाखला आणि जनरल रजिस्टर दुरुस्ती अधिकार शिक्षणाधिकाऱ्यांना – मा. मुंबई उच्च न्यायालयाचा दिलासादायक निकाल

शाळा सोडल्यानंतर किंवा शिक्षण पूर्ण झाल्यावर शाळेच्या दाखल्यावर जन्मतारीख, स्वतःचे नाव, वडिलांचे...

read more
दुष्काळाच्या या परिस्थितीत प्रशासनाने शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीर उभे राहावे – आ.कांदे

दुष्काळाच्या या परिस्थितीत प्रशासनाने शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीर उभे राहावे – आ.कांदे

पावसाने पाठ फिरविल्यामुळे मतदार संघात दुष्काळ सदृश्य परिस्तिथी निर्माण झाली असून आज पाऊस जरी पडला...

read more
मोरया गणेश मित्र मंडळातर्फे अनिष्ट रूढी-परंपरांना छेद – विधवा माता-भगिनींना आरतीचा मान…

मोरया गणेश मित्र मंडळातर्फे अनिष्ट रूढी-परंपरांना छेद – विधवा माता-भगिनींना आरतीचा मान…

लोकमान्य टिळकांनी गणेशोत्सवाची सुरुवात ही समाज प्रबोधन आणि जनसामान्यांच्या एकात्रीकरणासाठी केली...

read more
बेघर १२ मदारी कुटुंबांच्या पुनर्वसनासाठी वंचित बहुजन आघाडी आक्रमक; तीव्र आंदोलनाचा इशारा

बेघर १२ मदारी कुटुंबांच्या पुनर्वसनासाठी वंचित बहुजन आघाडी आक्रमक; तीव्र आंदोलनाचा इशारा

शहरातील आय.यु.डी.पी. (IUDP) खाकीबाग भागातील निष्कासन कारवाईत बेघर झालेल्या भटके-विमुक्त 'मदारी'...

read more
[hsas-shortcode group="" speed="10" direction="left" gap="50"]