loader image

१० नोव्हेंबर ते १ डिसेंबर रोजी येवला तालुका स्तरीय शालेय क्रीडा स्पर्धांचे आयोजन

Nov 10, 2022


येवला (प्रतिनिधी)
क्रीडा व युवकसेवा संचालनालय ,महाराष्ट्र राज्य ,पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय,नाशिक आयोजित येवला तालुकास्तर शालेय क्रीडा स्पर्धा २०२२-२३ चे आयोजन करण्यात आले आहे. दिनांक १० नोव्हेंबर ते १ डिसेंबर २०२२ रोजी विविध शालेय क्रीडा स्पर्धा होत असून दिनांक १० नोव्हेंबर सकाळी १० वा.आर्यनिकेतन स्कुल पारेगाव,ता.येवला येथे येवला पंचायत समितीचे गट शिक्षणाधिकारी प्रशांत गायकवाड यांच्या हस्ते व राष्ट्र सेवादल महाराष्ट्रचे कार्याध्यक्ष प्रा.अर्जुन कोकाटे, येवला तालुका क्रीडाधिकारी महेश पाटील,सरपंच सचिन आहेर,उपसरपंच नंदू जाधव,आर्यनिकेतन स्कुलचे अध्यक्ष खुशाल गायकवाड,बाबासाहेब खिल्लारे इ.मान्यवर उपस्थित राहणार आहेत अशी माहिती येवला तालुका क्रीडा संयोजक नवनाथ उंडे यांनी दिली आहे.

येवला तालुका क्रीडा स्पर्धेत खालील प्रमाणे खेळांच्या स्पर्धा होणार आहेत. योगासन,कराटे,क्रिकेट,हॉलीबॉल,फुटबॉल,कुस्ती,कबड्डी, खो-खो,अथेलेटिक,बुद्धिबळ इत्यादी क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. स्पर्धांच्या यशस्वीतेसाठी प्रवीण घोगरे,कृषिकेश गायकवाड, सचिन आहिरे, श्रीकांत वाघचौरे,अजय पारखे,अमोल गायकवाड, सचिन पाडांगळे,सागर लोणारी,सागर मुटेकर,शैलेश गायकवाड, शैलेश घाडगे,प्रा.शिंदे,शिवाजी साताळकर व अमोल राजगुरू प्रयत्नशील असल्याची माहिती अशी माहिती येवला तालुका क्रीडा स्पर्धा प्रसिध्दी प्रमुख शरद शेजवळ यांनी दिली आहे.
मानवी जीवनात खेळास अनन्यसाधारण महत्व असून विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्व विकासाकरिता सर्व क्रीडाशिक्षक,क्रीडापटू विद्यार्थी यांनी अधिकाधिक सहभाग घेऊन येवला तालुक्यातील ह्या स्पर्धा यशस्वी कराव्यात असे आवाहन येवला तालुका क्रीडा संयोजन नवनाथ उंडे सर यांनी केले आहे.
स्पर्धेत सहभागी होण्यासाठी ऑनलाइन प्रवेशिका आवश्यकआहे,वेगवेगळ्या ठिकाणी होणाऱ्या ह्या स्पर्धा त्या-त्या ठिकाणी सकाळी ठीक १० वाजता सुरू होतील,स्पर्धेसाठी संघ/खेळाडू अर्धातास आधी उपस्थित ठेवावे व सोबत अर्ज व ऑनलाईन संघ नोंदणी,खेळाडूचे आधारकार्ड, प्रवेश अर्ज स्पर्धा स्थळी जमा करावेत त्याशिवाय कोणत्याही क्रीडा प्रकारात सहभागी होता येणार नसल्याचे आयोजकांनी सांगितले आहे अधिक माहिती करता (उंडे सर) ९४२३०३९५१० ह्या क्रमांकावर संपर्क करावा.


अजून बातम्या वाचा..

महावितरण कंपनीच्या गलथान कारभाराचा कडेलोट – सर्वपक्षीय  वीज ग्राहक समितीचा आंदोलनाचा इशारा

महावितरण कंपनीच्या गलथान कारभाराचा कडेलोट – सर्वपक्षीय वीज ग्राहक समितीचा आंदोलनाचा इशारा

मनमाड शहरासह ग्रामीण भागात महावितरण च्या गलथान कारभारामुळे नागरिक हैराण झालेले आहेत,वारंवार वीज...

read more
अनियमित/खंडित वीज पुरवठा मनमाडच्या महावितरण अधिकाऱ्यांना भाजपा शिवसेना पदाधिकाऱ्यांनी धारेवर धरित विचारला जाब

अनियमित/खंडित वीज पुरवठा मनमाडच्या महावितरण अधिकाऱ्यांना भाजपा शिवसेना पदाधिकाऱ्यांनी धारेवर धरित विचारला जाब

मनमाड - शहरात गेल्या 11 दिवसा पासून दररोज अवकाळी पाऊस पडतो आहे या पावसाचे कारण सांगून महावितरण...

read more
.