loader image

गुड शेफर्ड इंग्लिश स्कूल मध्ये तालुकास्तरीय योगासन स्पर्धा – ३० विद्यार्थ्यांचा सहभाग

Nov 10, 2022


नांदगाव तालुकास्तरीय योगासन स्पर्धेचे गुड शेफर्ड स्कुल मध्ये आयोजन करण्यात आले होते.क्रिडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे तसेच जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजीत नांदगाव तालुका स्तरीय योगासन स्पर्धां मनमाड येथील गुड शेफर्ड स्कूल मध्ये आयोजीत करण्यांत आली होती. या स्पर्धेत एकूण 30 विद्यार्थ्यानी सहभाग घेतला. यामध्ये गुड शेफर्ड स्कूल, मनमाड, केंद्रिय विद्यालय, मनमाड, के. आर. टी. हायस्कुल, मनमाड, सेटं झेवियर्स हायस्कुल, मनमाड. या शाळेतील विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. योगासन स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी राष्ट्रीय वेटलिफ्टिंग प्रशिक्षक मा. प्रविण व्यवहारे सर, गुड शेफर्ड स्कूलचे प्राचार्य डॉ. क्लेमेंट नायडू, योगप्रशिक्षक मा. सुनिल ढमाले, श्री. स्वप्नील बाकळे सर, व श्री. विशाल झाल्टे सर मंचावर उपस्थित होते. प्रवीण व्यवहारे सर यांनी आपल्या मनोगतात योगाचे महत्त्व पटवून दिले. तसेच डॉ. क्लेमेंट नायडू यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात योगासनांमुळे विध्यार्थ्यांना अभ्यासात कशाप्रकारची मदत होते व जीवनातील नैराश्यावर मात करण्याचा मंत्र योगसाधनेमुळे प्राप्त करता येतो हे नमुद केले. स्पर्धेचे नियोजन गुड शेफर्ड शाळेचे क्रिडा शिक्षक. श्री. व्यंकटेश देशपांडे व श्री. परविंद्र हरनामसिंग रिसम यांनी केले. योगासन स्पर्धेच्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गुड शेफर्ड स्कूलचे शिक्षक श्री. भाऊसाहेब दाभाडे यांनी केले.


अजून बातम्या वाचा..

एक दिवशीय जिल्हास्तरीय टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेत महामानव फॉउंडेशन,मालेगाव संघ विजेता.

एक दिवशीय जिल्हास्तरीय टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेत महामानव फॉउंडेशन,मालेगाव संघ विजेता.

  मनमाड:-एम.एस.स्पोर्ट्स,मनमाड आयोजित भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर रेल्वे क्रिडांगण,मनमाड...

read more
मनमाडमधील धाडसी घरफोडी करणारे तीन सराईत गुन्हेगार अटकेत, १ कोटी ५ लाखांचा माल जप्त

मनमाडमधील धाडसी घरफोडी करणारे तीन सराईत गुन्हेगार अटकेत, १ कोटी ५ लाखांचा माल जप्त

मनमाड : मनमाड शहरातील डमरे कॉलनी परिसरातील व्यावसायिक मुर्तजा अब्दुल हुसेन रस्सीवाला यांच्या घरात...

read more
.