नांदगाव
नांदगाव तालुक्यातील वडाळी बुद्रुक ग्रामपंचायतीचे उपसरपंच दिलीप केशव नंद यांनी शासकीय जागेत घर व शौचालय बांधकाम केलेले असल्याचे सिद्ध झाल्याने मालेगाव च्या अपर जिल्हाधिकाऱ्यांनी त्यांचे ग्रामपंचायत सदस्यत्व अपात्र घोषित केल्याने खळबळ उडाली आहे.
. तालुक्यातील वडाळी बुद्रुक ग्रामपंचायतीच्या सन २०२१ ते २०२५ या पंचवार्षिक निवडणुकीत दिलीप नंद हे प्रभाग क्रमांक तीन मधून सर्वसाधारण पुरुष या जागेवर निवडून आले होते.मात्र त्यांनी वडाळी परिसरातील भालूर रस्त्यालगतच्या शासकीय जागेवर अतिक्रमण केल्याची तक्रार अर्ज क्रमांक ४३/२०२१ द्वारे येथील चंद्रभान आनंदा कोरडे यांनी मालेगाव च्या अपर जिल्हाधिकाऱ्यांकडे केली होती.
त्यावर अपर जिल्हाधिकाऱ्यांनी याची शहानिशा करून महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम १९५९ चे कलम १४ (१)(ज -३) प्रमाणे अपात्र घोषित केले आहे.
त्यामुळे तालुक्याच्या राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.सदरहू तक्रार अर्जाचे मालेगाव येथील कामकाज अँड. शरद एम काकड, यांनी पाहिले. त्यांना अँड. धनंजय देवरे, अँड. प्रवीण मोरे, गौरव लोखंडे यांनी सहकार्य केले.

मनमाड शहराचे आराध्य दैवत व नवसाला पावणाऱ्या वेशीतील श्री निलमणी गणेश मंदीरात 1997 पासून सलग 29 व्या वर्षी यंदा 11 दिवस भाद्रपद महागणेशोत्सव
मनमाड - बुधवार दिनांक 27 /08/2025 रोजी भाद्रपद शुध्द श्री गणेश चतुर्थी निमित्त सकाळी ठीक 09-30...