मनमाड: येथील महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयातील गणित शास्त्राचे प्राध्यापक श्री. संजय मधुकर चिंचोले यांनी डॉ. ए. पी. भदाणे, यांच्या मार्गदर्शनाखाली, सम काँट्रिब्युशन टू स्पेशल फंक्शन युझिंग फ्रॅक्शनल कॅल्कुलस (Some Contribution to Special Functions Using Fractional Calculus) या विषयावर सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाची डॉक्टरेट प्राप्त केली. त्यांच्या या उत्तुंग यशाबद्दल महात्मा गांधी विद्यामंदिर संस्थेचे जनरल सेक्रेटरी समाजश्री डॉ. प्रशांतदादा हिरे, संस्थेचे समन्वयक डॉ. अपूर्वभाऊ हिरे, संस्थेचे विश्वस्त युवानेते डॉ. अद्वयआबा हिरे, प्राचार्य डॉ. ए. व्ही. पाटील, उपप्राचार्य, सर्व प्राध्यापक, शिक्षकेतर बंधू-भगिनी व विद्यार्थी यांनी अभिनंदन केले व शुभेच्छा दिल्या.

मनमाड शहराचे आराध्य दैवत व नवसाला पावणाऱ्या वेशीतील श्री निलमणी गणेश मंदीरात 1997 पासून सलग 29 व्या वर्षी यंदा 11 दिवस भाद्रपद महागणेशोत्सव
मनमाड - बुधवार दिनांक 27 /08/2025 रोजी भाद्रपद शुध्द श्री गणेश चतुर्थी निमित्त सकाळी ठीक 09-30...