loader image

स्वातंत्र्यसेनानी कॉ. माधवराव गायकवाड ध्येयनिष्ठ विचारांची धगधगती मशाल होती – भास्कर कदम

Nov 13, 2022


नांदगाव : स्वातंत्र्यसेनानी, कष्टकरी खंडकरी शेतकऱ्यांचे लढवय्ये नेते कॉ. माधवराव गायकवाड महाराष्ट्राची बुलंदतोफ तशीच ध्येयनिष्ठ विचारांची धगधगती मशाल होती, असे प्रतिपादन नांदगावचे माजी नगराध्यक्ष भास्कर कदम यांनी त्यांच्या चतुर्थ स्मृती दिनानिमित्त केले.
नांदगाव येथील माणिक संकुलात छत्रपती पतसंस्थेच्यावतीने समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. प्रारंभी छत्रपती शिवाजी महाराज तसेच कॉ. माधवराव गायकवाड यांचे प्रतिमेचे पूजन केले. समारंभाच्या अध्यक्षस्थानी भास्कर कदम होते. कॉ. माधवराव यांनी स्वातंत्र्य लढा, गोवामुक्ती आंदोलन याचबरोबर कष्टकरी कामगार, खंडकरी शेतकरी, शेतमजुर यांच्यासाठी आपले आयुष्य खर्ची घातले. ते आयुष्यभर भारतीय कम्युनिष्ठ पक्षाशी एकनिष्ठ राहिले. आजच्या राजकीय कोलांटउड्या लक्षात घेता त्यांची पक्षनिष्ठा दीपस्तंभासारखी मार्गदर्शक ठरते,असेही कदम यांनी आपल्या भाषणात नमूद केले.
याप्रसंगी पतसंस्थेचे व्यवस्थापक देविदास नंद, माजी नगरसेवक प्रकाश थोरात, राजेंद्र पाटील (व्यवस्थापक नामको बँक नांदगाव), साईनाथ पवार, धनराज अग्रवाल, सुमेर कासलीवाल, संतोष पारख, भगवान गांगुर्डे, मुन्ना कलंत्री, नाना पगार, शालिनी पगारे, सुनिता जैन, मजहर खान, भरत कासलीवाल यांचेसह अल्पबचत प्रतिनिधी व कर्मचारी वर्ग इत्यादी उपस्थित होते.


अजून बातम्या वाचा..

 फलक रेखाटन विशेष दिनांक : ६ जुलै २०२५ – आषाढी एकादशी स्थळ : नूतन माध्यमिक विद्यालय, भाटगाव (ता. चांदवड, जि. नाशिक)

 फलक रेखाटन विशेष दिनांक : ६ जुलै २०२५ – आषाढी एकादशी स्थळ : नूतन माध्यमिक विद्यालय, भाटगाव (ता. चांदवड, जि. नाशिक)

  महाराष्ट्राच्या सांस्कृतिक आणि अध्यात्मिक ओळखीचा अविभाज्य भाग म्हणजे आषाढी एकादशीची वारी —...

read more
“विकसित महाराष्ट्र २०४७” साठी शेतकऱ्यांचा सहभाग महत्वाचा; शासनाचे व्हिजन डॉक्युमेंट तयार करण्याची प्रक्रिया सुरू

“विकसित महाराष्ट्र २०४७” साठी शेतकऱ्यांचा सहभाग महत्वाचा; शासनाचे व्हिजन डॉक्युमेंट तयार करण्याची प्रक्रिया सुरू

  नांदगाव: मारुती जगधने महाराष्ट्र शासनाने "विकसित भारत २०४७" या राष्ट्रीय उद्दिष्टानुसार...

read more
मनमाड महाविद्यालयात स्व.लोकनेते व्यंकटराव हिरे यांच्या पुण्यतिथी निमित्त प्रतिमा पूजन व वृक्षारोपण संपन्न

मनमाड महाविद्यालयात स्व.लोकनेते व्यंकटराव हिरे यांच्या पुण्यतिथी निमित्त प्रतिमा पूजन व वृक्षारोपण संपन्न

मनमाड = कला,विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय, मनमाड येथे शिक्षण महर्षी, महात्मा गांधी विद्यामंदिर व...

read more
.