निवडणूक आयोगाने राज्यातील मुदत संपलेल्या ७७५१ ग्रामपंचायत निवडणूक कार्यक्रम नुकताच जाहीर केला. यात नांदगाव तालुक्यातील १५ ग्रामपंचायतींचा समावेश आहे. त्यासाठी १८ डिसेंबरला मतदान तर २० डिसेंबरला मतमोजणी होणार आहे. यात सरपंच निवड हि थेट जनतेतून होणार आहे.
तालुक्यातील कसाबखेडा, लोढरे, तळवाडे, हिरेनगर, पिंपरखेड, लक्ष्मिनगर, मुळडोंगरी, हिसवळ बु., नागपूर, शास्त्रीनगर, नवसारी, धोटाने खु., बोयगाव, धनेर, भार्डी या ग्रामपंचायतीचा समावेश आहे. निवडणूक जरी ग्रामपंचायतिची असली तरी यात पुढील काळात लगेच होऊ घातलेल्या पंचायत समिती आणि जिल्हा परिषद निवडणुकीची सरावाची निवडणूक मानले जात आहे.
तालुक्यातील विविध गटातील या ग्रामपंचायती असल्याचे जनतेचा कौल कोणत्या दिशेने आहे हे पाहणे उत्सुकतेचे असेल. २८ नोव्हेंबर पासून नामनिर्देशन अर्ज भरण्यास सुरुवात होणार असून २ डिसेंबर अंतिम तारीख आहे. यानंतर ५ डिसेंबर ला छाननी, 7 डिसेंबरला माघारीची मुदत देण्यात आली आहे.

के आर टी हायस्कूल अँड ज्युनियर कॉलेजमध्ये शाळा प्रवेशदिन साजरा
. येथील कवी रवींद्रनाथ टागोर हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेजमध्ये शाळेचा पहिला दिवस म्हणजे शाळा...