loader image

प्रतापगडावर उभारणार छत्रपतींचा भव्य पुतळा – सरकारने प्रस्ताव मागवला

Nov 16, 2022


प्रतापगड पायथ्याजवळील अफजलखान कबर जवळील अतिक्रमण हटवल्यानंतर सरकारने आता अजून एक मोठा निर्णय घेतला असून अतिक्रमण काढलेल्या ठिकाणी आता अफजलखानाचा कोथळा बाहेर काढण्याचा देखावा असणारा छत्रपतींचा भव्य पुतळा उभारण्यात येणार आहे.पर्यटनमंत्री मंगलप्रभात लोढा यांनी ट्विट करुन ही माहिती दिली आहे. शिवभक्तांच्या मागणीला लक्षात घेता किल्ले प्रतापगड परिसरात छत्रपती शिवाजी महाराज स्वराज्यावर चाल करुन आलेल्या अफजल खानाचा कोथळा काढतानाचा पुतळा आणि लाईट आणि साउंड शो सुरु करण्यासाठी तात्काळ प्रस्ताव मागविण्यात आला आहे असे लोढा यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.

कबरीजवळील अतिक्रम हटवले

छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाची गाथा सांगणाऱ्या किल्ले प्रतापगडाच्या पायथ्याशी असलेले अफजलखानच्या कबरीजवळचे अनधिकृत बांधकाम मोठ्या पोलीस बंदोबस्तात हटवण्यात आले होते. जिल्हा प्रशासन आणि पोलिसांनी संयुक्तपणे ही कारवाई केली. शिवप्रतापदिनी शिंदे-फडणवीस सरकारने केलेल्या कारवाईचे सर्व स्तरातून स्वागत होत आहे.

गेल्या काही वर्षात या परिसरात मोठ्या प्रमाणावर अतिक्रमण वाढले होते वन विभागाच्या जमिनीवर अतिक्रमण करुन कबरीचे उदात्तीकरण केले जात असल्याचा आरोप करण्यात येत होता. यावरून हिंदुत्वावादी संघटनांनी आवाज उठवला होता.हा वाद न्यायालयात गेला. काही वर्षांपूर्वी मुंबई उच्च न्यायलयाने कबरीभोवती झालेले अनधिकृत बांधकाम तोडण्याचे आदेश दिले होते. याला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात आलं. सर्वोच्च न्यायालयानेही बांधकाम अनधिकृत ठरवत तोडण्याच्या सूचना दिली होती.


अजून बातम्या वाचा..

महावितरण कंपनीच्या गलथान कारभाराचा कडेलोट – सर्वपक्षीय  वीज ग्राहक समितीचा आंदोलनाचा इशारा

महावितरण कंपनीच्या गलथान कारभाराचा कडेलोट – सर्वपक्षीय वीज ग्राहक समितीचा आंदोलनाचा इशारा

मनमाड शहरासह ग्रामीण भागात महावितरण च्या गलथान कारभारामुळे नागरिक हैराण झालेले आहेत,वारंवार वीज...

read more
अनियमित/खंडित वीज पुरवठा मनमाडच्या महावितरण अधिकाऱ्यांना भाजपा शिवसेना पदाधिकाऱ्यांनी धारेवर धरित विचारला जाब

अनियमित/खंडित वीज पुरवठा मनमाडच्या महावितरण अधिकाऱ्यांना भाजपा शिवसेना पदाधिकाऱ्यांनी धारेवर धरित विचारला जाब

मनमाड - शहरात गेल्या 11 दिवसा पासून दररोज अवकाळी पाऊस पडतो आहे या पावसाचे कारण सांगून महावितरण...

read more
.