ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांचे आज दिनानाथ मंगेशकर रुग्णालयात निधन झाले. ते ७७ वर्षांचे होते. आज संध्याकाळी त्यांच्यावर पुण्यातील वैकुंठ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार केले जाणार आहे.
गेल्या १७ दिवसांपासून ते पुण्यातील दिनानाथ मंगेशकर रुग्णालयात दाखल होते. आज २६ नोव्हेंबर रोजी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. गोखले यांना मधुमेह आणि जलोदर झाल्यामुळे त्यांच्यावर उपचार सुरू होते.












