मनमाड :
कोरोना काळातील ऑनलाईन शिक्षणपद्धती आजही कांही शाळांमधून सुरुच असल्याने बहुजन गरीब समाजातील मुला-मुलींना शिक्षणापासून वंचित ठेवले जात आहे. शिवाय खाजगी शाळांमधूनही भरमसाठ फी आकारली जात असल्याने गरीब बहुजन समाजातील मुला-मुलींना महागडे शिक्षण घेणे अवघड झालेले आहे. एकुणच शिक्षणपद्धतीतून बहुजनांच्या लेकरांना बाहेर फेकले जात आहे. राईट-टू-एज्यूकेशन ही संकल्पना मोडीत काढून म.फुले सावित्रीबाई फुले यांनी मुला-मुलींच्या शिक्षणाचा पायाच आजची शिक्षणपद्धती ऊखडून टाकीत आहे. म.फुलेंचा वारसा सांगणाऱ्या कार्यकर्त्यांना याबाबत गंभीरतेने लक्ष घालण्याची नितांत गरज आहे असे मनमाड जनहित विकास संस्थेचे सह-सचिव श्री. रामशंकर महाले यांनी म.फुले पुण्यतिथी कार्यक्रमात अध्यक्षस्थानावरून बोलतांना व्यक्त केले.
मनमाड जनहित विकास संस्था आणि मनमाड बचाव कृती समितीने आयोजित सदर कार्यक्रमात प्रारंभी २६/११ च्या दहशतवादी हल्ल्यातील शहिदांना तसेच दिवंगत कार्यकर्ते डि.एम.व्यवहारे यांना आदरांजली वाहण्यात आली. संविधान दिनाच्या निमित्ताने प्रास्ताविकेचे सामुहिक वाचन करण्यात आले. तसेच अभ्यासिकेत नियमित अभ्यास करून भारतीय सैन्य दलात निवड झालेल्या मनमाड परिसराच्या ग्रामिण भागातील तीन युवकांचा हृद्य सत्कार करण्यात आला.
सत्यशोधकच्या जेष्ठ कार्यकर्त्या अलका महाजन, सुषमाताई तिवारी, कांतीलाल येणारे पुंडलिक कचरे, बी.टी.पद्मने, लिलाताई राऊत, अर्जुन साळवे यांनीही आपले विचार मांडले. श्रीमती समशाद सैय्यद, आशा खरे, युनुस पठाण, आर.बी. ढेंगळे, कृष्णा पगारे, मोतीराम भालेराव, रेखाताई येणारे, रमेश खरे, सुरेश वाघ, अप्पा परदेशी आदी प्रतिष्ठीत मंडळी उपस्थित होती. सुशांत केदारे यांनी आभार प्रदर्शन केले.
*मनमाड महाविद्यालयात राजमाता जिजाऊ भोसले व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांना जयंती निमित्त विनम्र अभिवादन*
*मनमाड* महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित, कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय मनमाड येथे...











